Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्यावतीने पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

पैठण / किरण काळे
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.या दरवाढीविरोधात पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि.6 जुलै रोजी दुपारी एक वाजता पैठण तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांंच्या आदेशानुसार व प्रांताध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष मा.आ. कल्याण काळे व माजी मंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोल दरवाढ केली आहे.त्याचा आर्थिक बोझा देशातील गरीब व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे.सध्या कोरोना महामारी आजार, लॉकडाऊन, आर्थिक मंदी या सर्व कारणामुळे सामान्य जनता हैराण आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या बॅरलचे भाव कमी असताना सुद्धा केंद्र सरकारने दरवाढ केली आहे.ही पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशाराही कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे,पैठण तालुकाध्यक्ष विनोद तांबे,
पैठण न.प. गटनेते हसनोद्दीन कटयारे,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर दसपुते यांच्यासह महिला काँग्रेस,युवक कॉंग्रेस,अल्पसंख्याक सेल,शहर अध्यक्ष जुनेद गाजी,सेवादल,ओबिसी सेल,अनुसूचित जमाती सेल तसेच विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close