Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

मुंबई : लॉकडाऊन उठवल्यानंतर मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. आता ही लोकल रेल्वे सेवा लवकरच सुरु करणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुंबईतील लोकल रेल्वे सर्वांसाठी सुरु करण्याबाबत आज (दि.25) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, आज मुंबईतील लोकल रेल्वे सर्वांसाठी सुरु करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह, यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

यावेळी मुंबईतील लोकल रेल्वे सर्वांसाठी सुरु करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही, त्यामुळे गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल, यादृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईकरांची लाईफलाईन सर्वांसाठी सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close