Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

कोविडबाधिताचा मृत्यू, 37 रुग्णांची वाढ आतापर्यंत 545 कोविडबाधित

औरंगाबाद mh20live: औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील 50 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान आज सकाळी 7.50 मिनिटांनी मृत्यू झाल्याचे औषधवैद्यक शास्त्राच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 3 मे रोजी सकाळी चार वाजता पुढील उपचारासाठी घाटीत त्यांना संदर्भीत केले होते. मधुमेह, किडनीचा आजारही त्यांना होता. मूत्रपिंडाचे काम कमी झाल्याने त्यांचे चार वेळा डायलिसिस केले. त्यांना श्वासोश्वासास त्रास होत असल्याने सहा मे रोजी रात्री आठ वाजता कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर लावले. मागील दोन दिवसांपासून रक्तदाब कमी झाल्याने व न्युमोनिआ व मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे.
कोविडबाधित 545 रुग्ण
औरंगाबाद शहरातील विविध भागातील 37 रुग्णांची आज नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडबाधितांची संख्या 545 झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 22 पुरूष, 15 महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये (कंसात रुग्ण संख्या) राम नगर (19), सिल्क मिल कॉलनी (08), रोहिदास नगर (02), वसुंधरा कॉलनी, एन-7, सिडको (01), चंपा चौक (05), दत्त नगर (01), संजय नगर (01) या परिसराचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील 65 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आजच्या 50 वर्षीय कोविडबाधित पुरूष रुग्णांसह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे मिनी घाटीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

 1. The plug welcomes you with a super discount of 15% on every product for a limited period of time! (Promo code: THEPLUG)

  We offer the largest assortment of private databases! Such as:

  – The Largest collection of Linkedin Databases!
  – Forex Consumers (worldwide)
  – Casino Consumers (worldwide)
  – Business Databases (worldwide)
  – Cryptocurrency consumers (worldwide)
  – many more..

  And the best part of it! We are the only source you will ever need! We have the largest database on the market with the greatest prices and team.

  Visit us: https://silent-plug.com/

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close