Subscribe to our Newsletter
क्राईम

विजेचा धक्का लागुन चिमकल्याचा मृत्यु चनकवाडी येथिल घटना

पैठण/किरण काळे

पैठण तालुक्यातील चनकवाडी येथील दुर्घटना महावितरणच्या गलथान कारभारामुळे छोट्या बालकाला जिव गमवावा लागला आहे.चनकवाडी (ता.पैठण)  येथे आई सोबत गोदावरी वरून कपडे धुऊन वापस घरी परतत असतांना नदीच्या कडेला असलेल्या विद्युत वाहक खांबाच्या तानास हात लागल्याने यश गणेश सामसे हा मुलगा मरण पावला. चनकवाडी येथे गोदावरी नदीच्या कडेला शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाची लाईट आहे.त्या लाईटच्या पोल जवळून गोदावरी नदी पात्रात जाण्यासाठी रस्ता आहे.आज सकाळी 10:30 वाजता मयत मुलाची आई पूजा गणेश सामसे ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असताना आई सोबत मुलगा यश गणेश सामसे वय साडे पाच वर्ष हा गोदावरी नदीवर गेला होता.यावेळी कपडे धुऊन आई घराकडे परतत असताना आई सोबत खेळत चाललेला हा लहान मुलगा याचा विद्युत पोलला दिलेला तारेच्या तानास हात लागला व त्या पोलच्या तानात करंट उतरल्याने मुलगा तानाच्या तारेला चिटकून मरण पावला आहे.तर नदीच्या कडेला पोलला दिलेल्या तानात करंट उतरले कसे,याबाबत रोष व्यक्त करून नातेवाईक व गावकरी यांनी महावितरणचे कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे चनकवाडी ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.या घटनेमुळे चनकवाडी गावातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.याबाबत पैठण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बिट जमादार किशोर शिंदे,पो.ना.कर्तारसिंग सिंगल,पो.कॉ. समाधान भागिले हे करत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close