Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

सेवायोजन नोंदणी कार्ड अद्ययावत करण्यास मुदत वाढ -सहायक आयुक्त

सेवायोजन नोंदणी कार्ड अद्ययावत करण्यास मुदत वाढ       -सहायक आयुक्त

         औरंगाबाद, दि.18 :- जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छूक व नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी अद्याप आपले आधार कार्ड संलग्न (लिंक)केले नसेल अशा सर्व उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यत ही प्रक्रिया www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवरुन ऑनलाईन पध्दतीने पूर्ण करावी. अन्यथा 30 सप्टेंबर 2020 अखेर सेवायोजन नोंदणी रद्द करण्यात येईल,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजकार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  नि.ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद या कार्यालयाव्दारे राबविण्यात येणाऱ्या  विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच रोजगाराच्या प्रशिक्षणाच्या आणि  स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी आधार  कार्ड  लिंक करुन आपला डेटा अद्ययावत करणे आवश्यक आहे.

तसेच आधार जोडण्याबाबत काही अडचणी आल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0240-2334859  वर किंवा या कार्यालयाचा [email protected] या ईमेलवर माहिती करीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजकार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  नि.ना. सूर्यवंशी यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close