Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेताचे तात्काळ सव्हें करून नुकसान भरपाई द्यावी – संभाजी पा भिलवंडे

  नायगाव ता./ शेषेराव कंधारे 
                  नायगाव , उमरी व धर्माबाद तालुक्यात खरिप हंगामात शेतक-यांनी कृषी दुकानदारांकडुन चांगल्या नामांकित कंपनीचे सोयाबीनचे बियाणे खरेदी करून पेरणी केलेले बियाणे उगवले नसल्याने संबधित व्यापारी व बिजं उत्पादक कंपन्या विरूध्द वरीष्ठ स्तरावर कारवाई व्हावी व नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेताचे तात्काळ सव्हें करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री  अशोकराव चव्हाण सह मुख्यमंत्री व कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य याच्या कडे निवेदनाव्दारे केले आहे. 
            खरीप हंगाम २०२०च्या सुरवातीलाच परीसरात पेरणीयोग्य चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतक-यांनी पेरणीला सुरवात केली व प्रामुख्याने सोयाबीन पिकांचा पेरा आधिक प्रमाणात केला.सोयाबीन पेरणी करुन आज जवळपास १०ते१२ दिवस होऊन गेले तरीही आज पर्यंत ते उगवले नाही. म्हणून व्यापारी व बियाणे उत्पादक कंपन्या कडून शेतक-यांना बोगस बियाणे पुरवण्यात आले हे सिद्ध होते आहे. 
        विविध कारणांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला असतांना ऐन खरिपाच्या हंगामात पेरलेले उगवत नसल्याने अगोदरच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. बियाणे न उगवण्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभाग व पंचायत समितीकडे जवळपास आज पर्यंत १४८ अर्जाच्या तक्रारारी अनेक नामांकित कंपन्यांचे बियाणे डबल लेबल सर्टिफाईड सोयाबीन असूनही उगवले नसल्याचे अर्ज शेतक-यांनी केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान झाले असून दुबारा पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढावलेले आहे .त्यामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेताचे तात्काळ सव्हें करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री  अशोकराव चव्हाण सह मुख्यमंत्री व कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य याच्या कडे निवेदनाव्दारे करण्यात आले आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close