Subscribe to our Newsletter
Loading
निसर्ग चक्रीवादळ

बापरे! पाहा रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात; श्रीवर्धन, अलिबागमध्ये तुफान पाऊस

रायगड | mh20live

श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळ जसजसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीनजीक पोहोचत आहे, तसतसं या वादळामुळं वातावरणात बदल होत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुंबईसह मंगळवारी सायंकाळपासूनच रत्तनागिरीतही पावसाला सुरिवात झाली आहे. 

बुधवारी सकाळच्या सुमारास म्हणजेच वादळ धडकणार असल्याच्या दिवशी एएनआय वृत्तसंस्थेकडून रत्नागिरीतील एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडिओमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील उत्तरेकडी भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाऱ्याचं स्वरुप इतकं रौद्र आहे की मोठमोठे वृक्षही या वाऱ्यामध्ये हेलकावे खात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. 

वादळी वारे घोंगावत असल्यामुळं रत्नागिरीमध्ये नागरिकांनीही घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये सध्या ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ किनाऱ्याच्या दिशेनं पुढे जात आहे. थोडक्यात वादळाचा हा वेग क्षणाक्षणाला वाढत आहे. परिणामी अनेक वृक्ष उन्मळूनही पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close