Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलविली कांदाबीज शेती

वडीगोद्री-आर व्हि. छिल्लारे

अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील उच्चशिक्षित तरुण सचिन मधुकर घाडगे यांनी २ एकरात कांदा बीजोत्पादन घेतले.हे घेताना योग्य नियोजन करून मेहनतीच्या जोरावर त्यांना ५ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.त्यामुळे शेती ही नियोजन पध्दतीने केल्यास नक्कीच फायदेशीर आहे.

महाराष्ट्रात जालना जिल्हा हा बियाणे कंपन्याचा बालेकिल्ल्या मानला जातो.जालण्यामध्ये बहुतांश बियाणे कंपन्या आहेत.अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथील शेतकरी सचिन घाडगे यांचे १२ वी नंतर एमसिव्हीसी होल्ट्रीकल्चर पूर्ण केले आहे.तसेच यांनी गतवर्षी मोसंबीत आंतरपीक म्हणून बीजोत्पादन कांदा लागवडीचा निर्णय घेतला.त्यांनी २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने २२ क्विंटल कांद्याची जालना बाजारामध्ये खरेदी करून ५५ हजार रुपयांचा कांदा बियाणे घेतले.

यानंतर घाडगे यांनी २८ नोव्हेंबर २०२० रोजी ८० आर क्षेत्रात ठिबक सिंचनच्या साह्याने ४ फूट पट्टा पध्दतीने कांद्याची लागवड केली.लागवडीनंतर गरजेनुसार फवारणी केली.फवारणीसाठी १५ हजार ५०० रुपये खर्च आला.तसेच २ खुरपणीसाठी ६२ मजूर लागले असून खुरपणी खर्च ९ हजार ३०० रुपये इतका लागला आहे.योग्य पद्धतीने नियोजन करून खतांचे २ ढोससाठी १४ हजार ४०० रुपये खर्च आला आहे.

ह्या वर्षी कांद्यासाठी प्रतिकुल वातावरण होते.त्यामुळे २ एकरात ६ क्विंटल उत्पन्न मिळाले.८५ हजार रुपये प्रति क्विंटलने ५ लाख १० हजार रुपये उत्पन्न मिळाले.एकूण खर्च ९४ हजार २०० रुपये इतका झाला.खर्च वजा जाता ४ लाख १५ हजार ८०० रुपये नफा झाला.बीजोत्पादन कंपन्या सोबत करार न केल्याने खुल्या बाजारात ८५० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री केली.त्यातून त्यांना ५ लाख १० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले.

शेती ही कायम तोट्यात आहे.अशी नेहमी चर्चा असते.परंतु शेती ही नियोजनबद्ध व तंत्रज्ञानाचा वापर करून केल्यास नक्कीच फायदा होतो.तरुणांनी नौकरीच्या मागे न धावता शेती व व्यवसायाकडे वळावे.ही करताना शिक्षणाचा वापर करावा.तसेच शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन घ्यावे.सचिन घाडगे,शेतकरी,पाथरवाला खुर्द

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close