Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

सातारा परिसरात बहीण, भावाचा गळा चिरून खून

mh20livr.com

औरंगाबाद, दि. 9 :सातारा परिसरातील एमआयटी जवळील एका घरात बहिण भावाचा निर्घुन खुन केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. दोघा बहिण भावांचा गळा चिरलेले मृतदेह बाथरूममध्ये आढळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सातारा परिसर, एमआयटी जवळील अल्फाईन हॉस्पिटलजवळील लालचंद राजपुत हे शेतीच्या कामानिमित्त पत्नी आणि मोठी मुलगी असे परिवारासह जालना येथे गेले होते. घरात त्यांची मुलगी किरण लालचंद राजपुत (१९) शिक्षण मॉडन कॉलेज शिवाजीनगर पुणे आणि त्याचा भाऊ सौरभ राजपुत (१७) हा दहावी वर्गात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जाबिंदा लॉन येथे शिकत होता. हे दोघे घरात होते. रात्री आठच्या सुमारास लालचंद राजपुत हे घरी परतले. त्यांनी वाहनाचा हार्न वाजविला घरातून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वाहन उभे करून घराची पाहणी केली असता बाथरूम मध्ये दोघा भाउ बहिणीचे मृतदहे आढळले. दोघांचे गळे चिरून खुन करण्यात आला होता. आरडाओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताचा उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दोघा भाऊ बहिणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवला.खुनाचे नेमके कारण कळु शकले नाही. या बाबत बोलताना पोलीसांनी सांगितले कि, खुन दुपारी झाला असुन घटना रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. खुनाचे कारण उशिरापर्यंत कळले नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close