Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सिल्लोड तालुक्यातील ७७ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी


सिल्लोड : विशाल जाधव

सिल्लोड तालुक्यातील ७७ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या दि.१८ तारखेला सोमवार रोजी होणार आहे.मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू केली जाणार असून (दि.१७) रविवार रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती नायब तहसिलदार संजय सोनवणे यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी बाबत सविस्तरपणे माहिती देतांना सांगण्यात आले की, सदरील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आयटीआय मध्ये उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या निणयंत्रात तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी नायब तहसीलदार संजय सोनवणे, किरण कुलकर्णी व विनोद करमनकर यांच्या अधिपत्याखाली १५ टेबलावर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाच्या वतीने मतमोजणी मतमोजणीच्या कामासाठी २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.सदरील मतमोजणी कडक सुरक्षेत केली जाणार आहे. मतमोजणीच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीला मतमोजणी कक्षात हजर राहता यावे यासाठी ओळख पत्र देण्यात आलेले आहे. ओळख पत्राशिवय मतमोजणी परिसरात व कक्षात ईतर कुणालाही सोडले जाणार नाही अशी माहिती नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी माहिती देतांना सांगितले आहे.Attachments area

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close