वाहतुक करतांना बनावट देशी दारु साठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

औरंगाबाद: ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी गस्त घेत असतांना निरीक्षक श्री.अरुणकुमार चव्हाण यांना खबर्यामार्फत माहिती मिळाली की हर्सुल – जटवाडा रोडने मारुती अल्टो कार क्र.MH२० Y.९७० मधुन विनापरवाना देशी दारुची वाहतुक होणार आहे त्या अनुषंगाने अधिकारी कर्मचाऱ्यांनी हर्सुल परिसरातील एकतानगर जटवाडा रोडवर सापळा लावुन संशयीत नमुद क्रमांकाची अल्टो कार अडवुन कारची झडती घेतली असता कारमध्ये देशी दारु भिगंरी संत्रा १८० मिली क्षमतेचे २० बॉक्स मिळुन आले ज्यात प्रती
बॉक्समध्ये ४८ बॉटल प्रमाणे एकुण ९६० बनावट देशी दारु भिगंरी संत्राच्या सिलबंद बॉटल मिळुन आल्या.बनावट देशी दारु साठा किमंत रुपये ४९९२०/- व अल्टो कार किमंत रुपये २०००००/- असा
एकुण रुपये २४९९२०/- चा मुद्देल जप्त करण्यात आला असुन आरोपी इसम पुंडलिक रयाजी रहाटे रा.हिवरा ता.फुलंब्री जि.औरंगाबाद यास अटक करण्यात आली आहे.सदरचा बनावट देशी
दारु साठा हा चोरटी विक्रीसाठी नेत असल्याचे चौकशीतुन समोर आले आहे. सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त श्री.प्रदीप पवार,अधीक्षक श्री.सुधाकर कदम यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे निरीक्षक श्री.अरुणकुमार चव्हाण, दुय्यम निरीक्षक मोहन मातकर,आशिष महिंद्रकर,सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत शेंदरकर,गणेश नागवे, प्रवीण पुरी,जवान सर्वश्री.ठाणसिंग जारवाल, योगेश कल्याणकर,गणपत शिंदे,सुभाष गुजांळ जवान नि.वाहन चालक सुभान खाँ पठान यांचे पथकाने केली.पुढील तपास निरीक्षक श्री.अरुणकुमार ‘चव्हाण हे करीत आहे.