Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कळंबोली शहरातील अस्वच्छतेबाबत नगरसेवक रवींद्र भगत यांचा पुढाकार

स्वखर्चाने परिसर स्वच्छ करून घेतल्याने नागरिकांत समाधान
सोसायट्यांनी मानले शेकाप नगरसेवक रविंद्र भगत यांचे आभार 


पनवेल : राज भंडारी 
कळंबोली वसाहतीतील ०२ ई एल आय जी येथे रस्त्यांच्या कडेला मातीचे ढिगारे साचलेले निदर्शनात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून सदरची परिस्थिती असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता साचली होती. ही बाब शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक रविंद्र भगत यांना समजताच स्वखर्चाने त्यांनी येथील रस्त्यांच्या कडेला असलेले ढिगारे साफ करून घेतले. 


https://mh20live.com/sister-in-law-farming/हेही वाचा बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news


एल आय जी मधील स्मृतीवन गार्डन या सोसायटीच्या समोरील रस्त्यांवरच गेल्या अनेक महिन्यांपासून मातीचे ढिगारे साठवून ठेवले असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी रविंद्र भगत यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर येथे अस्वच्छता तसेच वाहतुकीला अडथळा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ एक डंपर, जेसीबी आणून परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी अभियान सुरू केले. तत्काळ दखल घेतल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close