Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करणार; निगेटीव्ह असणाऱ्यांना शाळेत यावेच लागेल; अन्यथा कारवाई


गुवाहाटी | देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यातील शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे.दरम्यान, राज्यातील आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, आता १ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांसाठी नाही, पण शिक्षकांसाठी शाळेत येणे बंधनकारक केले आहे. आसामच्या शिक्षणमंत्र्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

आसामचे शिक्षण आणि आरोग्यमंत्री हेमंत बिश्वा शर्मा यांनी सांगितले की, येत्या २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यातल्या सगळ्या शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे, शाळेत येण्याअगोदर शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्या सर्व शिक्षकांना शाळेत येणे आवश्यक आहे.

तसेच, १ सप्टेंबरपासून आसाममधल्या शाळांमध्ये सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी काम सुरू करणे, आवश्यक असल्याचे हिमंता बिश्वा शर्मा यांनी म्हंटले आहे.

दिलेल्या आदेशानुसार, जे शिक्षक उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिक्षकांसाठी शाळा सप्टेंबरपासून सुरू होणार असली, तरी विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करायची की नाही, याचा निर्णय अजून आसाममध्ये झालेला नाही.

पण तरीही २५ ऑगस्टनंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close