Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कोरोनामुळे शेतीकडे वळला तरूण

सोयगाव,/विजय पगारे mh20live Network

-कोरोना या जागतीक माहामारीमुळे काही वाईट तर काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. सोयगाव अंजिंठा पर्वत रांगेलगतचा तालुका असुन कृषी प्रधान तालुका आहे. तालुक्यात ८५ ते ९० टक्के शेती केली जात होती. परंतू आलीकडचे आधुनिक युगामुळे तालुक्यातील तरूण युवकांनी  शेतीकडे पाठ फिरवली होती.

तरूण वर्गाला पालक शेतात मदत करण्यास सांगूनही तरूण वर्ग शेतीकडे दुर्लक्ष करू लागला होता. शेतीत काय आहे एवढं त्यापेक्षा माझं काम बरं हे तरूण मंडळींचं उत्तर असायचे. शेतात कष्ट नको की उन्हाचा चटका नको त्यापेक्षा ऑफिसाचा एसी बरा म्हनणारी मंडळी आता शेतात राबताना दिसत आहे. आपल्या आई वडीलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करत आहेत. जी शेती होती ती अधिक करण्याकडे तरूण मंडळीचा कल गेलेला आहे. एरवी कपडे खराब होतील. कपड्यावरची इस्त्री मुडेल म्हणणारी मंडळी शेतीत काम करून कोरोनाशी लढा देत आहेत.

तालुक्यात एकही औद्योगिक वसाहत किंवा उद्योग धंदा नाही. आठ ते दहा धरणाने वेढलेला सोयगाव  औद्योगिकीकरणापासून चार हात लांबच राहीला आहे. निवडणूका आल्या की राजकारण्यांचे राजकारण चालते. त्यामुळे विकासाला खिळ बसलेल्या तालुक्याला शेती हा एकमेव पर्याय बनला आहे.

तालुक्यातील तरूण वर्ग मुंबई,सुरत, पुणे येथील मार्केट यार्डला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. तर काही तरुण छोटे मोठे उद्योग धंदा मुंबई पुण्याला जावून करत होते. करोना भारतात आला आणि शासनाने लॉकडाऊन घोशीत केले.अन सर्व कामधंदे ठप्प झाले. हाताला काम नाही. त्यामुळे जगणं अवघड होवून बसलं. जगावं कसं तर मग गावंकडे जावं आणि ओस पडलेली शेतीला पुन्हा उभारी द्यावी म्हणून हे सर्व तरूण मंडळींनी आपल्या गावाकडची वाट धरली,गाव जवळ केलआहे.

गावाकडे तरूण मंडळी आले खरे पण खायचे काय हा प्रश्न भेडसावू लागला. पुढे भविष्यात अशी वेळ येवू नये म्हणून आपली शेती कधीही बरी म्हणत हातात बैल नांगर घेवून शेताला कामाला सुरूवात तर या मंडळींनी केली. आणि ओस पडलेल्या शेतात न दिसलेला तरुण दिसू लागला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close