Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ढाकेफळ प्रा.आ.केंद्रात शिक्षकांची कोरोना तपासणी


पैठण / किरण काळे

राज्यात पाचवी ते आठवी पर्यंत  शाळा सुरु करण्याबाबत शासनाने हिरवा कंदिल दिला असल्यामूळे लोहगाव केंद्रातंर्गत शाळेतील शिक्षकांची ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना तपासणी करण्यासाठी नाक आणि घशातील स्वँब घेण्यात आले.           सर्व शाळातील  पाचवी ते आठवी चे वर्ग  दि.२७ जानेवारी पासुन सुरु करण्यात येत असुन शासनाच्या निर्णयानुसार शाळा उघडण्यापुर्वी शिक्षकांनी RT&PCR टेस्ट करुन घेणे बंधनकारक असुन लोहगाव केंद्राच्या अंतर्गत शाळेत एकूण साठ शिक्षकांनी तपासणी करुन घेणे जरुरी असताना  पहिल्या दिवशी केवळ ३६ शिक्षकानी तपासणी साठी हजेरी लावली.       

    शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची rt&pcrतपासणी दि.२७ जानेवारी पर्यंत करुन घेण्याचे तसेच ग्रामपंचायत स्तरावरुन शाळा निर्जंतुकीकरण करणे,शाळांना पल्स आँक्सिमिटर ,थर्मलगन उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे आदेश असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ.अतुल बोरे यांनी सांगीतले .   प्रतिक्रिया .१)शासनाच्या निर्णयानुसार ५वीते८वी वर्ग शिक्षकांची  आज ३५जनांची आरटी&पिसीआर तपासणी करण्यात आली असुन पुढेही तपासणी करण्यात येणार आहेडाँ.अतुल बोरे,वैद्यकीय अधिकारी – ढाकेफळ प्रा.आ.केंद्र
२)तालुक्यातील सात प्रा.आ.केंद्र,दोन ग्रामिण रुग्णालयात तसेच आरोग्य प्रशिक्षण केंद्रमध्ये तपासणी करण्यात येणार असुन कोविड सेंटर मध्ये अशी नेहमी चालु असते.सर्व शिक्षकांना तपासणी करणे बंधनकारक असल्यामूळे शासनादेशावरुन तपासणी करण्यात आली.
डाँ.भुषण आगाज
तालुका आरोग्य अधिकारी,पैठण

.सदर शिक्षकांच्या आरटी&पिसिआर तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डाँ.अतुल बोरे,वैद्यकीय अधिकारी डाँ.सुदर्शन काळे,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डाँ .सायली कुलकर्णी यांनी टेस्ट घेतला तर त्यांना सहकार्य म्हणुन प्रयोगशाळा तंत्रज्ञान संदिप हनवते,आरोग्य सहाय्यक शिवाजीराव थोटे,मिलिंद गायकवाड,आरोग्य सेवक संतोष सातपूते,संतोष सिरसाठ,वाहनचालक विजय गायकवाड यांनी काम पाहिले.यावेळी एकनाथ लाटे,संभाजी शिंदे,योगिराज खोब्रागडे,कल्याण इथापे ,शाम आरसेवाड,गणेश बोरूडे,विष्णू वानखेडे,सुभाष गोरे,सारिका बद्दे,सविता शिंदे आदी शिक्षक व शिक्षिका यांनी तपासणीत सहभाग नोंदवला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close