Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 47 हजार 638 जणांनी केली करोनावर मात


अलिबाग,जि.रायगड दि. 16:- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 47 हजार 638 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 230 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 345, पनवेल ग्रामीण-458, उरण-105, खालापूर-90, कर्जत-28, पेण-147, अलिबाग-164, मुरुड-12, माणगाव-50, तळा-4, रोहा-100, सुधागड-6, श्रीवर्धन-13, म्हसळा-6, महाड-12, पोलादपूर-5 अशी एकूण 2 हजार 545 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-20 हजार 271, पनवेल ग्रामीण-5 हजार 957, उरण-1 हजार 798, खालापूर-2 हजार 376, कर्जत- 1 हजार 607, पेण-3 हजार 526, अलिबाग-4 हजार 462, मुरुड-396, माणगाव- 1 हजार 815, तळा-156, रोहा-2 हजार 184, सुधागड-379, श्रीवर्धन-368, म्हसळा-300, महाड- 1 हजार 642, पोलादपूर-401 अशी एकूण 47 हजार 638 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-172, पनवेल ग्रामीण-38, उरण-15, खालापूर-13, कर्जत-11, पेण-11, अलिबाग-22, मुरुड-3, माणगाव-4, रोहा-9, सुधागड-1, श्रीवर्धन-4, महाड-6, पोलादपूर-1 असे एकूण 310 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-508, पनवेल ग्रामीण-123, उरण-102, खालापूर-114, कर्जत-95, पेण-97, अलिबाग-128, मुरुड-23, माणगाव-34, तळा-9, रोहा-79, सुधागाड-25, श्रीवर्धन-20, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-18 असे एकूण 1 हजार 462 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-131, पनवेल ग्रामीण-21, उरण-19, खालापूर-10, कर्जत-3, पेण-11, अलिबाग-15, माणगाव-6, रोहा-8, श्रीवर्धन-1, म्हसळा-1, महाड-2, पोलादपूर-2 असे एकूण 230 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 7 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-3, खालापूर- 1, कर्जत-2, पेण-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 85 हजार 957 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 188 आहे.

उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close