Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मनपाचे 300खाटाचे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू होणार :- मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे

औरंगाबाद/. mh20live Network

आज दि 17 जुलै रोजी प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील साई स्पोर्ट्स प्राधिकरण येथे भेट दिली .या ठिकाणी मुलाचे वसतिगृह आहेत .सदर परिसरात निसर्ग रम्य वातावरण आहे सदरील वसतिगृहाची व्यवस्था चांगल्या स्थितीत असल्यामुळे या ठिकाणी 3 दिवसात 300 खाटाचे नवीन कोविड केअर सेंटर महानगरपालिका सुरू करणार आहे.असे आयुक्तांनी सांगितले स्वतः या ठिकाणचे रूम, बेड ,शौचालय यांची पाहणी केली .या नवीन कोविड केअर सेंटर ला साई स्पोर्ट्स प्राधिकरण चे संचालक श्री भांडारकर यांनी सहमती दिली आहे .त्यानुसार येत्या 3 दिवसात नवीन कोविड केअर सेंटर या ठिकाणी सुरू होणार आहे .या पाहणी वेळी मा आयुक्तांच्या समवेत साई स्पोर्ट्स प्राधिकरण संचालक भांडारकर ,शहर अभियंता एस डी पानझडे,घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांची उपस्थिती होती.

जयसिंगपुरा येथील नागरिकांना आयुक्तांनी दिला धीर..
आज सकाळी महानगरपालिका टास्क फोर्स च्या वतीने जयसिंगपुरा येथे अँटीजन व RTPCR टेस्टिंग चे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी नागरिकांनी या टेस्टिंग साठी विरोध केला होता मा आयुक्तांना ही बाब समजल्यावर त्यांनी स्वतः य ठिकाणी जाऊन तेथील नागरिकांची समजूत घातली व त्यांना या अँटीजन टेस्टिंग चे महत्व सांगितले व हे टेस्टिंग करणे किती गरजेचे आहे हे पटवून सांगितले .यानंतर नागरिकांनी अँटीजन टेस्टिंग साठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .टास्क फोर्स पथक प्रमुख श्रीमती अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आरोग्य अधिकारी, कर्मचारी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close