Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज 248 कोरोनाबाधित रुग्णांची भर (मनपा 188, ग्रामीण 60) जिल्ह्यात 5061 कोरोनामुक्त

जिल्ह्यात 5061 कोरोनामुक्त, 3049 रुग्णांवर उपचार सुरू*
औरंगाबाद, दि. 12 (mh20live network) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 227 जणांना (मनपा 178, ग्रामीण 49) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5061 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 248 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 188, ग्रामीण 60) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8464 झाली आहे. आजपर्यंत एकूण 354 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3049 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दुपारनंतर 118 रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 106 रुग्णांची अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
*मनपा हद्दीतील रुग्ण : (93)*
उमाजी कॉलनी, बन्सीलाल नगर (1), गजानन नगर (1), कांचनवाडी (1), न्यू गणेश नगर (3), जाधववाडी (2), एन अकरा (3), राजाबाजार (6), मसनतपूर (11), रेल्वे स्टेशन परिसर (2), इटखेडा (3), गजानन कॉलनी (6), केसरसिंगपुरा (11), शाह बाजार (1), एन सात आयोध्या नगर (25), एन बारा (17) 
*चेक पॉइंटवरील रुग्ण (24)*
कांचनवाडी (8), हर्सुल (4), नगर नाका (6), दौलताबाद (1), चिकलठाणा (5)
*ग्रामीण रुग्ण : (01)*
गोंगरगाव, सिल्लोड (1)
*तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू*
शहरातील तीन विविध खासगी रुग्णालयात बीड बायपास रोडवरील अबरार कॉलनीतील 48 वर्षीय पुरूष, राम नगरातील 70 वर्षीय स्त्री, न्यू श्रेय नगर येथील 70 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close