Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

अँटीजन टेस्टद्वारे 1851 जणांची स्वॅब तपासणी 65 जण पॉजिटीव्ह


औरंगाबाद (mh20live Network) दि.10 :- कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी आता अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. याद्वारे आज शहरातील विविध ठिकाणी एकूण 1851 जणांचे स्वॅब घेण्यात आले.त्यापैकी 65 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी नागरिकांची अॅण्टीजन टेस्ट सुरू करण्यात आली आहे.यामध्ये हर्सुल जेल क्वार्टर येथे 234 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यापैकी 19 पॉझिटिव्ह आले तर एकनाथ नगर येथे 73 पैकी पाच पॉझिटिव्ह, विशाल नगरमध्ये 111 पैकी पाच पॉझिटिव्ह,एन-फोर येथील 102 पैकी तीन पॉझिटिव्ह, विठ्ठल नगरमध्ये 64 पैकी एक पॉझिटिव्ह तर गांधी नगरमध्ये 117 पैकी आठ, नक्षत्र वाडीत 100 पैकी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.तर वसंत विहार मध्ये 222 तपासणी केली आणि कामगार नगरमध्ये पन्नास जणांची तपासणी केली मात्र या दोन्ही ठिकाणी एक ही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
या ठिकाणांसह शहरातील चेक पॉइंटवरही अॅण्टीजन टेस्ट करण्यात आली.यामध्ये दौलताबाद टि पॉइंटवर 61 जणांचे स्वॅब तपासण्यात आले त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले तर झाल्टा फाटा येथे 197 पैकी आठ , नगरनाका येथे 177 पैकी दोन , चिकलठाणा येथे 170 पैकी एक,हर्सुल टि पॉइंट येथे 118 पैकी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . तर कांचनवाडी चेक पॉइंटवरील तपासणी केलेल्या 55 पैकी कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. या विविध ठिकाणी एकूण 1851जणांचे स्वॅब तपासण्यात आले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close