Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज63रुग्णांची वाढ कोरोनाबाधितांची संख्या 1767

जिल्ह्यात 565 रुग्णांवर उपचार सुरू, 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले


औंरगाबाद/mh20live

दि.04 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1767 झाली आहे. यापैकी 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 565 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. बेगमपुरा (2), लेबर कॉलनी (1), पडेगाव (1), बायजीपुरा (1),हर्सुल परिसर (1), भारतमाता नगर (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), रोशन गेट (2), देवळाई चौक परिसर (1), समर्थ नगर (1), शिवशंकर कॉलनी (5), शिवाजी कॉलनी (1), सईदा कॉलनी (1), चेतना नगर (2), एन-सात सिडको (1), एन-2विठ्ठल नगर (1),विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), बारी कॉलनी (1), हनुमान नगर, गारखेडा (1), मील कॉर्नर (1), एन चार (1), क्रांती नगर (1),विजय नगर, गारखेडा (1), एन सहा संभाजी कॉलनी (6), अयोध्या नगर (1), न्यू हनुमान नगर (1), कैलास नगर (1), अजिंक्य नगर, गारखेडा (3),एन 1,सिडको (1), सुंदर नगर, पडेगाव (1), गणेश कॉलनी (2), एन चार , समृद्धी नगर,सिडको (2), कटकट गेट, नेहरू नगर (1), आंबेडकर नगर, एन -7 (3), जय भवानी नगर (1), राजा बाजार (4), अन्य (6) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
खासगी रुग्णालयात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये समता नगरातील कोरोनाबाधित असलेल्या 43 वर्षीय पुरूष रुग्णाचा 03 जून रोजी सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 70, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 18, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 89 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close