Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

बापरे औरंगाबादेत आज 104 कोरोनाबाधित रुग्णांची भर,जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित रुग्ण सख्या

जिल्ह्यात 1709 कोरोनामुक्त, 1161 रुग्णांवर उपचार सुरू,

औरंगाबाद, दि. 17 (mh20live) : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1161 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 104 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 3036 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
राजीव नगर (1), समता नगर (2), पेंशनपुरा (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (2), मसून नगर (1), पळशी (2), एन आठ सिडको (5), पुष्प गार्डन (1), गजानन नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सेव्हन हिल (1), हडको (1), एसआरपीएफ कॉलनी (2), जटवाडा रोड (1), बीडबायपास (1), नारेगाव (3), जयभवानी नगर (2),ठाकरे नगर (1), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (1), मनजीत नगर (1), एन नऊ सिडको (3), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (2), शंभू नगर, गारखेडा (1), न्यू विशाल नगर (5),ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (1), यशोधरा कॉलनी (1), गुलमंडी (1), पद्मपुरा (1), नागेश्वरवाडी (2), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (1), बेरी बाग (1), राजनगर (1), उत्तम नगर (1), जवाहर कॉलनी (1), ज्योती नगर (1), समर्थ नगर (10), सिडको (1) हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), रमा नगर (2), विश्रांती नगर (3), सिडको वाळूज महानगर दोन (2), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (2), शिवाजी नगर (3), न्यू हनुमान नगर (2) गारखेडा (2), मयूर नगर (1), राहुल नगर (1), बजाज नगर (1), संभाजी कॉलनी (1), संजय नगर (1), आयोध्या नगर,‍सिडको (1), मोतीवाला नगर (1), औरंगपुरा (1), अन्य (1) विश्वभारती कॉलनी (1) , रांजणगाव, शेणपूजी (1), चिकलठाणा (1), गौतमी अपार्टमेंट (1), प्रताप नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), बुढीलेन (1), रोशन गेट (1), बायजीपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 40 स्त्री व 64 पुरूष आहेत.
आतापर्यंत 11709 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1709 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधिताचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) 17 जून रोजी मध्यरात्री 12.45 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील बायजीपुरा गल्ली क्रमांक 27 येथील 75 वर्षीय पुरूष रुग्णाचा 17 जून रोजी सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने घाटीत आतापर्यंत 122 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 121 मृत्यू औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.
तसेच शहरातील खासगी रुग्णालयात कटकट गेट येथील 65 वर्षीय स्त्री आणि अन्य एका खासगी दवाखान्यात श्रीराम नगराजवळील विश्वभारती कॉलनीतील 56 वर्षीय स्त्री रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 121, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 44, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
***

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close