Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेट

औरंगाबादेत ब्रिटनहून आलेला आणखी एक पॉझिटिव्ह

आरोग्य यंत्रणा हादरली : बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरूच

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ब्रिटनहून आलेली 57 वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यापाठोपाठ ब्रिटनहून आलेला एक 29 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे रविवारी दि.27 समोर आले. या तरुणाची शनिवारी आरटीपीसीआर चाचणी केली होती. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी दिली. मागील दोनच दिवसांत ब्रिटनहून आलेले दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याने औरंगाबाद हादरले आहे.
ब्रिटन देशात कोरोनाच्या नवीन घातक विषाणूचा जन्म झाला आहे. या घातक विषाणूने ब्रिटनमध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या विषाणूची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच ब्रिटनहून येणार्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने ब्रिटन येथून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यातच शुक्रवारी ब्रिटनहून आलेली 57 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या महिलेस धूत हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापाठोपाठच रविवारी ब्रिटन येथून आलेला एक 29 वर्षीय तरुण (रा. आरेफ कॉलनी) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आल्याने औरंगाबादकरांना धक्का बसला आहे. या तरुणाची काल शनिवारी आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्याच्या चाचणीचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. या तरुणास जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे, असे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close