Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर जिल्ह्यात 2069 कोरोनाबाधित

जिल्ह्यात 1253 कोरोनामुक्त
708 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दि. 08 mh20live : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 708 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2069 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शिवशंकर कॉलनी (1), बौद्ध नगर (1), पीर बाजार, उस्मानपुरा (8), पोलिस क्वार्टर, तिसगाव (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (2), सातारा परिसर (3), पद्मपुरा (1), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (1), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), मजनू हिल, दमडी मोहल्ला (1), ज्युबली पार्क (1), गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (2), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (5), सादाफ कॉलनी, कटकट गेट (2), पुंडलिक नगर (1), विद्या निकेतन कॉलनी (2), भोईवाडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1),एन-चार, सिडको (1), कैलास नगर (1), पंढरपूर परिसर (4), अन्य (2), देवशी पिंपळगाव, गंगापूर (1), सावरखेडा, सोयगाव (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 19 महिला आणि 30 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1253 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत दोन, खासगीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील संजय नगरातील गल्ली क्रमांक 13 येथील रविवारी (दिनांक 07 जून रोजी) रात्री सात वाजता 43 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा आणि आठ जून रोजी दुपारी 12.10 वाजता इंदिरा नगरातील 70 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खासगी रुग्णालयात बायजीपुऱ्यातील 63 वर्षीय कोरोनाबाधित पुरूषाचा आज सकाळी 8.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका खासगी रुग्णालयात शिवाजी नगर येथील 65 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 82, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 25, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 108 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close