Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजनदेशविदेश

अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादग्रस्त, मंत्री छगन भुजबळांकडून चौकशीचे आदेश


अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली?

नाशिक : अभिनेता अक्षयकुमारने केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खासगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.अभिनेता अक्षयकुमारने केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खासगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मंत्री छगन भुजबळांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. नियम डावलून अक्षयकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटलंय. मंत्री भुजबळांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमार एक दिवस नाशिक मुक्कामी होता. खासगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला अक्षय आल्याने शहरात कुतूहलाचा विषय झाला होता. अक्षयच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. अक्षयच्या येण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काही वैद्यकीय कारणांनिमित्ताने आल्याची माहिती मिळत होती. नाशिकचे हवामान चांगले असल्याने पुन्हा नाशिकला येण्याचा मानस अक्षयने व्यक्त केला आहे. अक्षय मार्शल आर्टची अकॅडमी नाशिकमध्ये भविष्यात सुरू करणार, अशी चर्चा आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close