Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

ऊसावरील लोकरी माव्याचे नियंत्रण

किडीची ओळख:
ऊसाच्या पानाच्या खालील बाजूस मध्य शिरेलागत पांढऱ्या लोकारीसारखे मेणतंतुधारी
पंखी व बिनपंखी मावा पिलासह आढळतो. मादीच्या पोटातून नुकतीच बाहेर पडलेली
बाल्यावस्थेतील पिल्ले पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची व अतिशय चपळ असतात.
बाल्यावस्था चार वेळा कात टाकते म्हणजेच चार रुपांतर अव्स्थेमधून जाते. पंखी माव्याची
मादी काळसर तांबुस व पिल्ले फिक्कट हिरवट तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले
फिक्कट हिरवट तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिक्कट पिवळी दिसतात.

वाचा सविस्तर news


नुकसानीचा प्रकार:
मावा ऊसाच्या पानाखाली स्थिर राहून रस शोषण करतो. त्यामुळे पीक निस्तेज होते
व पानाच्या कडा सुकतात. मावा पानावर मधासारखा चिकट पदार्थ विष्टेद्वारे बाहेर टाकते.
त्यावर बुरशी वाढून पिके काळी होतात त्यामुले कर्बग्रहण क्रिया मंदावते. अती उपद्रव
झाल्यास ऊस कमकुवत होतो, वाढ खुंटते, तसेच उत्पादनात व साखरेच्या उताऱ्यात घट येते.
नियंत्रणाचे उपाय:
मशागतीय उपाय:

कीड ग्रस्थ भागात ऊसाची पट्टा किंवा रुंद सरी पद्धतिने लागण करावी. किड ग्रस्थ
शेतातील पाने दुसऱ्या शेतामध्ये नेऊ नये. किडग्रस्थ बेने वापरू नये. उस लागवडी पूर्वी बेने
प्रक्रिया करावी, ३०० मि.लि. मॅलॅथिऑन १०० लिटर पाणी घेऊन त्यात बेने १५ मिनिटे बुडवून
घ्यावी.
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news


रासयनिक खताचा संतुलित वापर करावा नत्रयुक्त खाताचा वापर जास्त केल्यास
किडी च्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
मावा किडीचे जैविक नियंत्रण :
डिफा (कोनोब्राथा) अॅफिडीव्होरा या परभक्षी मित्र कीटकाच्या १००० अळ्या/ कोष
किंवा मायक्रोमस (मगरअळी) या परभक्षी मित्र कीटकाच्या २५०० अळ्या/ कोष किंवा
क्रायसोपर्ल्रा या मित्र कीटकाच्या २५०० अळ्या/ कोष प्रती हेक्टरी या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्थ
शेतात सोडाव्यात. जैविक मित्रकिडी शेतात सोडल्यावर कीटक नाशकाची फवारणी ३ ते ५
आठवडे टाळावी.

वाचा सविस्तर news उन्हाळी तिळ लागवड व्‍यवस्‍थापन


रासायानिक् कीटकनाशके
मिथिल डिमेूटॅन २५ टक्के प्रवाही १५ मि.लि. किवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १५
मि.ली. किंवा मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी

करावी आणि ज्या ठिकाणी फवारणी करणे शक्य नाही तेथे मिथिल मिथिल पॅराथिऑन २
टक्के भुकटी ४० किलो /हेक्टरी प्रमाणे धुरळणी करावी.

डॉ. निलेश एस. रोडे आणि प्रा. किरण एम. जाधव सहायक प्राध्यापक
महात्मा गांधी मिशन, नानासाहेब कदम कृषीमहाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद 

वाचा सविस्तर news शेतक-यांना निर्यातीस अवशेष मुक्‍त डाळिंब विकसित करण्‍यास सहाय्य

वाचा सविस्तर news मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी आवाहन

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close