Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान उघडे पडले:महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई :सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसल्याचा अहवाल एम्सने दिला आहे. त्यामुळे, सुशांतसिंहच्या प्रकरणावरून मुंबईवर टीका करणाऱ्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. मुंबईला बदनाम करण्याचे हे कारस्थान होते, खोट्यांचे पितळ उघड पडलं आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

सुशांतसिंह राजपूतचा खून की आत्महत्या यावरून देशात गदारोळ सुरू होता. सुशांतसिंहच्या व्हिसेरा अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. या आहवलात सुशांतसिंह हत्या झाली नसल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे, सुशांतसिंह प्रकरणावर पडदा पडला असला तरी महाराष्ट्र आणि मुंबईवर गरळ ओकणार्‍यांना शिवसेनेने चांगलेच धारेवर धरले आहे.

एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालावर बोलताना मुंबईच्या महापौर पेडणेकर म्हणल्या की, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी इतरांना बदनाम करण्याचे काम सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झाले आहे. मुंबई पोलीस, मनपा, मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. मात्र खोट्यांचे पितळ उघडे पडले आहे. यंत्रणांनी काय समोर आणले ते पाहा. मुंबईला, आदित्य ठाकरेंना, शिवसेनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र केले गेले. मात्र आमचा यंत्रणांवर विश्वास आहे, या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातो आहे. आरोग्य सेवा, पोलीस सेवा आणि नेत्यांची बदनामी करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घ्यावा, त्यांची चौकशी होणं गरजेचे आहे अससेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close