Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेस सेवादलाचे धरणे आंदोलन

www.mh20live.com

औरंगाबाद /mh20live Network

काँग्रेस  अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, सेवा दलाचे अध्यक्ष  लालजी देसाई महाराष्ट्राचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात निर्दशने आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ शेतकरी व सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.त्या अनुषंगाने आज दिनांक २९ जून सोमवार रोजी औरंगाबाद पेट्रोल-डिझेल भाववाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी म.प्र.काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष  विलास औताडे  शहराध्यक्ष अल्ताफ पटेल, सौ. जिल्ह्याध्यक्षा  प्रियंका खरात तालुकाध्यक्ष निलेश पवार, कैलास उकिरडे, गोविंदराव गायकवाड, काकासाहेब इथर, रघुनाथ म्हस्के, सुरेश पवार, गोपीनाथ जाधव,  मुनीर पटेल, सलीम मामा, विजय जाधव, व ईतर सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close