Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध

मुंबई | औरंगाबादच्या नामंतराचा मुद्दा आणखी पेटत चालला आहे. विरोधी भाजप पक्ष तर नामंतराची मागणी करतच आहे पण इकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून एकमेकांविरूद्ध भूमिका घेऊन आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील आणि व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल, असं अग्रलेखात म्हणत शिवसेनेने काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे.
औरंगाबादचं नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोथ करणारे उपस्थित करत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रसेने जाहीरपणे नामंतराला विरोध केला होता. शिवसेनेनेही आता काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यावर काँग्रेसचं काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close