राम मंदिर उभारणीत कॉंग्रेसची उडी ; मध्य प्रदेशात निधीसंकलनाला सुरूवात

भोपाळ : राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता भाजप आणि हिंदुत्वादी संघटनांनी राम मंदिर उभारणीसाठी निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशातच आता “राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार, मंदिर ले रहा आकार” असं म्हणात काँग्रेसने राम मंदिर उभारणीत उडी घेतली आहे. राम मंदिर उभारणीसाठी कॉंग्रेसने निधी गोळा करण्याचा स्वतंञ कार्यक्रम हाती घेतला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहे.
भारतीय जनता पार्टी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी निधी जमवणे सुरु केले आहे. त्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यानंतर आता काँग्रेससुद्धा राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे निधी उभारत आहे. मध्य प्रदेशमध्ये त्या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे म्हटले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे. त्यांनी भोपाळमध्ये तशा आशयाचे पोस्टर्स लावले असून त्यामध्ये राम मंदिराची निर्मिती करणे हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठी आपण निधी द्यावा,असे पोस्टरमध्ये लिहीले आहे.