Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

करुणा आणि कृतज्ञता समाजाला पुढे नेते!… माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मत


पनवेल: सूरज म्हात्रे

समजाप्रती आस्था असणे वेगळे आणि समाजातील गुणवंतांना हेरून त्यांच्या कार्याचे कौतुक करताना अंतरंगात असलेली करुणा आणि कृतज्ञता समाजाला प्रगती पथावर नेवू. शकते असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, माजी खासदार आणि ज्येष्त विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.
पनवेल संघर्ष समितीने तथास्तु सभागृहात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील कोविड योद्ध्यांना सन्मानित करून कोविड संजीवनी पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कडू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मुणगेकर यांनी जागतिक पातळीवर कोविडमुळे झालेली मनुष्यहानी आकडेवारीसह विस्तृतपणे मांडली.
भावना व्यक्त करण्याचे तीन विचार आहेत. त्यातील शब्द, अश्रू आणि रक्त अशी विभागणीही त्यांनी करून संवेदना स्पष्ट करताना ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या कांदबरीतील दाखले दिले. ते म्हणाले की एकांतात आपल्याला डोळ्यांतील अश्रू सोबत करीत असतात. शब्दांतून आपण विचार व्यक्त करतो. पण जेव्हा कुणीच आपल्या मदतीला येत नाहीत तेव्हा अश्रू आपली सोबत करीत असतात. तसेच मनातील विचार हे रक्ताचे नातं सांगत असले तरी पुन्हा ते विचार डोक्यात घोळत असतात.
यावेळी त्यांनी मुंबई आणि पोलिस संरक्षण यांचे नाते विस्तृत करताना मुंबईचे जगाच्या पाठीवर वेगळे अस्तित्व असल्याने सांगितले. पोलिसांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. कुणा एकाच्या कृतीवरून संबंध पोलिस दलाला दोषी ठरविण्याची कृती घातक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सर्व. कोविड योद्ध्यांचा गौरव करताना त्यांनी कोविड काळात दिलेल्या योगदानाविषयी भावस्पर्शी उदगार काढले.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी यांनी कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी, सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या कोविड योगदानाबद्दल अभिनंदन केले.
त्या म्हणाल्या की, महिलांनी कुटुंब सांभाळून. कोविड काळात फार मोठी कामगिरी बजावली.
सहाय्यक पोलिस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी कोविड काळात आदिवासी आणि वाहनचालक तसेच भुकेल्या नागरिकांची केलेली अन्नपाण्याची व्यवस्था विस्तृतपणे मांडली. पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामाची समाजानेही पोचपावती दिली असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक कांतीलाल कडू यांनी केले. डॉ. भक्तीकुमार दवे यांनी मार्गदर्शन केले. सन्मानपत्राचे वाचन भास्करराव चव्हाण यांनी सूत्रसंचालन मल्लिनाथ गायकवाड यांनी तसेच आभार सुनील भोईर यांनी मानले.
पाहुण्यांचे औक्षण प्रा. चित्रा देशमुख, निकिता जोशी आणि टीमने केले.
पनवेल संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिक मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी केला.

सत्कारमूर्तींमध्ये यांचा होता सहभाग 
१. डॉ. नुपूर कृष्णन्क्लि निकल न्यूट्रिशनिस्ट, फिट इंडिया ऍम्बेसिडर (मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स ऍन्ड स्पोर्ट्स) २. डॉ. जनार्दन वसंत देशपांडे रेल्वे कामगार नेते, सह कार्याध्यक्ष, रेल कामगार सेना
मुलुंड (पूर्व) ३. श्री. दिपक भातुसे प्रतिनिधी झी-२४ तास ४. श्री. काशिनाथ माटल ज्येष्ठ कथा लेखक
५. श्री. मानसिंग चव्हाण प्रमुख जल सुरक्षा दल रक्तदाते व प्लेटलेट दाते, पनवेल
६. श्री. संजय परशुराम कदम मुख्य वार्ताहर, दैनिक पुढारी
डोंबिवली (पूर्व) ७. श्री. सुरेश ढोमे व्यावसायिक व समाजसेवक
फोर्ट ८. सौ. संगिता फापाळे कला शिक्षिका बालमोहन विद्यामंदिर
९. श्री. हेमंत सुधाकर सामंत विश्‍वस्त, संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट, परेल
दादर (पश्‍चिम) १०. श्री. पंकज लक्ष्मण म्हेतर समाजसेवक तसेच अध्यक्ष, सारस फाऊंडेशन शिवडी, मुंबई. ११. सौ. स्वाती जाधव फ्लेबोटोमिस्ट्, एन्.एम.मेडिकल दादर (पश्‍चिम)
१२. श्री. नितिन कोलगे व्यावसायिक व समाजसेवक
परेल (पूर्व) १३. श्री. राजीव काळे उपाध्यक्ष, रायगड बँक सहकारातील कुशल संघटक
चिंचपोकळी (पूर्व) १४. श्री. गणेश आमडोसकर संस्थापक अध्यक्ष जीवनदाता सामाजिक संस्था
रक्तदाते व प्लेटलेट दाते वडाळा (पूर्व) १५. श्री. जयराम सुधाकर नाईक
अध्यक्ष, थॅलेसेमिया निर्मूलन समिती मुलुंड (पश्‍चिम) १६. श्री. प्रशांत नारायण म्हात्रे महाराष्ट्र अध्यक्ष, डोनेट अ लाईफ रक्तदाते, प्लेटलेट दाते कांदिवली (पश्‍चिम) १७. श्री. प्रशांत वसंत घाडी
पोलिस कॉन्स्टेबल रक्तदाते तसेच प्लेटलेट दाते आणि प्लाझ्मा दाते लालबाग, मुंबई-१२.
१८. श्री. विक्रम विश्रांत यादव ऑर्गनायझर बॉम्बे ब्लड गु्रप ऑफ इंडिया तासगांव, सांगली.
१९. श्री. किरण म्हात्रे संस्थापक अध्यक्ष डोनेट अलाईफ रक्तदाते आणि प्लेटलेट दाते
माझगांव, मुंबई-१० २०. श्री. राजेंद्र भिकाजी साळसकर (पत्रकार) अध्यक्ष, बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती काळाचौकी, मुंबई-३३. २१. श्री.विश्‍वास दाते रक्तदाते आणि प्लेटलेट दाते
भांडूप (पश्‍चिम) २२. श्री. दिपक घाडिगांवकर कार्याध्यक्ष बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती
२३. श्री. हणमंत कुंभार ब्लड डोनर सातारा, रक्तदाते आणि ब्लड डोनर मोटिव्हेटर
सातारा २४. श्री. साईनाथ गवळी क्रियाशिल कार्यकर्ते महाराष्ट्र, मातंग एकता दल संघटना बांद्रा (पूर्व) २५. श्री. शशिकांत मुंबरे गायन शिक्षक काळाचौकी, मुंबई-४०० ०३३
२६. श्री. संदेश पुरळकर घनकचरा कर्मचारी मुंबई महानगरपालिका
आग्रीपाडा, मुंबई. २७. श्री.गणेश बाळकृष्ण शिंदे वॉर्ड अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.२०५,
काळाचौकी, मुंबई-४०० ०३३. २८. श्री. जयकुमार चंद्रकांत साटेलकर
संस्थापक अध्यक्ष युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवार पनवेल, नवी मुंबई.
२९. श्री. रविंद्र महादेव कदम जलकामे कर्मचारी पाणी पुरवठा विभाग मुंबई महानगरपालिका
दादर (पश्‍चिम) ३०. श्री. गजानन नार्वेकर रक्तदाते आणि थॅलेसेमिया निर्मूलन कार्यकर्ते,
विरार, ३१. श्री. भावेश पवार
अग्निशमन कर्मचारी आणि रक्तदाते अग्निशमन दल,
ठाणे महानगरपालिका
३२. श्रीमती अमृता चव्हाण
सामाजिक कार्यकर्त्या, शिवडी, मुंबई.
३३. श्री. ऋषिकेश पुरुषोत्तम साबळे
रक्तदाते तसेच थॅलेसेमिया निर्मूलन कार्यकर्ता
३४. श्री. विकास येवले
रक्तदाते, जीवनदाता सामाजिक संस्था
३५. श्री. संजय कुलकर्णी
रक्तदाते, जीवनदाता सामाजिक संस्था
३६. संतोष दत्ताराम शेटये
समाजसेवक
३७. श्री. राजकुमार राठोड
अध्यक्ष-थॅलेसेमिया निर्मूलन समिती
विशेष निमंत्रित ः
१) श्री.विजय कदम-वृत्त निवेदक
२) श्री. के. ज्योथी कृष्णन्
३) श्री. सुरेश फापाळे
४) सौ. अश्‍विनी म्हात्रे 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close