Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणमराठवाडा

जालन्यात कोरोना व्हॅक्सीनची रंगीत तालीम आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत

जालना : कोरोनाची लस लवकरच येणार असून आरोग्य विभागाकडून लसीकरणाची पुर्वतयारी आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत जालना शहरातील जिल्हा रुग्णालय, अंबड येथे मत्स्योदरी स्कूल, तर बदनापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेलगाव येथे कोरोनाची ड्राय रन घेण्यात आली.
यात प्रत्येक केंद्रांवर २५ स्वयंसेवकांना लस देण्याचा सराव करण्यात आला.

शिवाय प्रत्यक्ष लसीकरणावेळी केल्या जाणारी सर्व कार्यप्रणाली अवलंबण्यात आली. निवड करण्यात आलेल्या ७५ स्वयंसेवकांना मोबाईलद्वारे आधीच संदेश देण्यात आला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना केंद्रावर भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. लस घेतली म्हणजे निश्चिंत झालो असे समजू नका. लसीकरणाचे रिझल्ट यायला वेळ लागू शकतो. त्यामुळे आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे टोपे म्हणाले. अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाऐवजी जवळच असलेल्या मत्स्योदरी विद्यालयात कोरोना लस देण्याचा ड्राय रन तब्बल वीस मिनिटे उशिराने सुरू झाला. यासाठी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळीच मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून केंद्रावर शनिवारी सकाळी ८ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु या केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्यांसह तहसीलदार विद्याचरण कवडकर, पोलिस उपनिरीक्षक मेंगडे हे सर्वांत अगोदर आले. नऊनंतर एकेक कर्मचारी येऊ लागले. त्यामुळे ड्राय रन करण्यास वीस मिनिटे उशीर झाला. या केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रांग लावली होती, त्यांच्या ओळखपत्राची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्यानंतर वेटींगरुमध्ये बसवले. त्यानंतर लसीकरण कक्षात लसीची माहिती देऊन लस टोचण्याबाबतचे रंगीत तालीम घेतली. लस दिल्यानंतर इंजेक्शन नष्ट करण्यात आले. लसीकरण केलेल्या कर्मचाऱ्यास अर्धातास निगराणी कक्षात ठेवण्यात आले. या दरम्यान, काही त्रास होत असेल तर या कक्षात तत्काळ प्राथमिक उपचार केले जातील, प्रकृतीत सुधारणा होत नसेल तर उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाईल, अशी रंगीत तालीम घेण्यात आली. या कामी संपर्क अधिकारी डॉ. सोनखेडकर, वैद्यकीय अधीक्षक जगन्नाथ तलवाडकर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. कोरोना लस येत्या काही दिवसांत येणार असली तरी याची पूर्व तयारी म्हणून शनिवारी सकाळी 7 ते 11 या वेळेत सेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाची ड्राय रन घेण्यात आली असून 25 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला यावेळी सर्व प्रथम पोलिस तपासणी, आधार तपासणी व नंतर लस अशा पद्धतीने एका व्यक्तीला 6 मिनिटांचा कालावधी लागला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close