Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

नामविस्तार दिनानिमित्त नागरिकांनी गर्दी टाळावी -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दिनांक 09 :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  नामविस्तार दिनानिमित्त  कोरोनाची ‍पार्श्वभूमी लक्षात घेता नागरिकांनी गर्दी टाळण्याचे  आवाहन  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापण दिनानिमित्त कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली  त्यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले की शहरात कोरोना विषाणुचा प्रसार नियंत्रणात आला  असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नामविस्तार दिनानिमित्त जाहीर कार्यक्रम, सभा, रॅली आदी कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळून आरोग्याची काळजी घेत घरुनच अभिवादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत अंतिम बैठक सोमवारी 11 जानेवारी रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सचिन निकम, रि.पा.ई.चे जिल्हा अध्यक्ष संजय ढोकळ, पॅथर्स रिपब्लिकन पार्टीचे गुणरत्न सोनवणे, भिमशक्ती संघटनेचे संतोष भिंगारे, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close