Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

रतन टाटांचे उदाहरण देत राऊतांनी लगावला पंतप्रधान मोदींना टोला

काही दिवसांपूर्वी टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा आपल्या जुन्या कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी पुणे येथे त्यांच्या घरी पोहचले होते. त्यांच्या या कृत्याची सर्व देशभरातुन स्तुती करण्यात आली होती हाच मुद्धा पकडत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजच्या सामना अग्रलेखातून टोला लगावला आहे.

पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी वाऱ्यात कुडकुडुत उभा आहे. या आंदोलनात ५७ शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्यांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणूसकी नसलेले सरकार कोणत्या शाहीत बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते, असा शब्दात राऊत यांनी सामनातून मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

तीन कृषी कायदे रद्द व्हावे या मागणीवर मागच्या ४० दिवसांपासून पंजाब, हरियाणा येथून आलेले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. या आंदोलनात काही शेतकऱ्यांनी आपला प्राणही गमावला. या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी उद्योजक रतन टाटांचं उदाहरण देत पंतप्रधानांवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी ८३ वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला असा टोला राऊतांनी लगावला आहे.
आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या छोट्या घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले ‘टाटा’ हे भारतरत्न का झाले अव अंबानी-अदानी यांना ‘टाटां’ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नितीचे समर्थक आहेत,’ असं राऊतांनी म्हटलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close