Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

चक्रीवादळग्रस्तांना आणखी वाढीव मदत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोकणसह राज्यातील आपदग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मुंबई, दि. 17 : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री बोलत होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सीगला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रायगडच्या पालक मंत्री कु. अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, खा.विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम चालू ठेवावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीचा शासन निर्णय आजच निर्गमित करुन वाटप तात्काळ सुरु करण्यात येईल.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचवण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे
उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजपर्यंत कोकणवासियांना कमी मदत मिळत गेलेली आहे. परंतु आता निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव निधी आजच वितरित करण्यात येईल. हा निधी योग्य त्या नुकसानग्रस्तांना मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close