Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई/mh20live Network

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अखेरीस विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्याने ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद राहणार की जाणार? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर त्यांना विधानपरिषद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रंही देण्यात आलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य
शिवसेनेमधून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी, काँग्रेसमधून राजेश धोंडीराम राठोड आणि भाजपमधून गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close