Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

*औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाचा घेतला आढावा

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची जाणीव पावलागणिक जपावी

शहरातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेणार

नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणाचे जतन करून विकास साधा

औरंगाबाद : नागरिकांना केंद्रबिंदू ठेऊन योजना राबविण्याचे निर्देश‍ित करत औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्याच्या विविध विकास कामांची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई,रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सर्वश्री आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, माजी खाासदार चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, भयंकर अशा स्वरूपाच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये यंत्रणांनी कौतुकास्पद कार्य केलेले आहे. या संकटावर यंत्रणेच्या पुढाकाराने मात करणे शक्य झाले. त्यातच शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेस मोठ्याप्रमाणात राज्यात प्रतिसाद मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिन्यावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ची लावण्यात आलेले स्टीकर्स या माध्यमातून मोठ्याप्रमाणात जनजागृती होण्यास हातभार लागला आहे. अशाच प्रकारचा उपक्रम राज्यभर राबविण्यात यावा, अशी अपेक्षा श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली. आजच बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवरासंदर्भात लोणार येथे बैठक घेतली असून त्यासंदर्भात करावयाचे संवर्धन आणि विकास याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. अशाप्रकारचा अमुल्य असा ठेवा आपल्या राज्यात विविध ठिकाणी आहे, त्यांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात यावी. त्याचबरोबर घाटी प्रशासनाला आवश्यक असणाऱ्या औषधी साठ्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा. औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मनपाने आकृतीबंध सादर करावा. शासनाने जिल्ह्यातील गुंठेवारी जमिनीचा प्रशनही सोडविण्याला प्राधान्य दिले. शहराची महत्त्वपूर्ण असलेली पाणी पुरवठा योजनाही पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भराडी-वांगी धरणाबाबतचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे यावेळी श्री. ठाकरे म्हणाले.

हेही वाचा मानवत माजी शहर प्रमूख राजेश कच्छवे यांच्या मार्गदर्शना खाले पेट्रोल, डिझल दर वाढीचा निषेध

तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे वाटत असले तरी मास्कचा वापर करावा. कारण मास्क हीच लस आहे. म्हणून त्याचा वापर प्रत्येकाने करावा. तसेच हात वारंवार धुवावेत आणि शारीरिक अंतर राखावे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

वाचा सविस्तर news शासकीय कला महाविद्यालयाचे जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

वाचा सविस्तर news पोलीस दलातील महिला बीट अंमलदार जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील :गृहमंत्री अनिल देशमुख

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close