औरंगाबाद, : राज्य शासनाने मागील दोन वर्षात केलेली नेत्रदीपक कामगिरी, शासनाचे निर्णय माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चित्र स्वरूपात तयार करून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे कौतुक असून जिल्हा परिषद, ग्रामविकास विभागाच्या योजनांचे जिल्हा पातळीवर अशाप्रकारचे चित्रप्रदर्शनाचेही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर औरंगाबादवासीयांनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
राज्य शासनाच्या द्वीवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाच्यावतीने पाच दिवसीय चित्रप्रदर्शन जिल्हा परिषदेसमोरील सिमंत मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेले आहे. या चित्रप्रदर्शनची पाहणी करताना श्री. गटणे बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, डॉ. धानोरकर, डॉ. प्रदीप कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.