Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

‘नवरी नटली’ या लोकगीताचे वेड लावणारे गायक छगन चौगुले यांचे निधन

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आवाजाने वेड लावणाऱ्या गायक छगन चौगुले यांचे निधन झाले. कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. छगन चौगुले यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कोरोनाशी झुंज देण्यात ते अपयशी ठरले. छगन चौगुले आपल्या खास लोकगीतांसाठी प्रसिद्ध होते. नवरी नटली हे त्यांचे लोकगीत खास लोकप्रिय होते. महाराष्ट्राच्या घराघरांंत आजही हे गीत आपल्याला वाजत असल्याचे पहायला मिळतं. नवरी नटली सोबतच ‘मांढरदेवी काळुबाईची कथा’ हा त्यांना अल्बम चांगलाच प्रसिद्ध होता. याशिवाय गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’, ‘दोन बायकांची चाल पाडली देवानं’ ही त्यांच्या काही प्रसिद्ध अल्बमची नावे आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close