Subscribe to our Newsletter
मराठवाडा

जालना:अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये समाविष्‍ठ असलेल्‍या सेवा आणि आस्‍थापना यांना सूट देण्‍यात आलेल्‍या वेळे मध्‍ये बदल

           जालना दि.18- कोविड – 19 च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे अनुषंगाने दिनांक 01 मे 2021 रोजीच्‍या सकाळी 7.00 वाजे पर्यंत करावयाच्‍या कार्यवाही  दिनांक 14 एप्रिल 2021 रोजीच्‍या आदेशानुसार संचारबंदी लागु करण्‍यात आली आहे. ती बाब पुन:श्‍च उदधृत करण्‍यात येत आहे.

     नागरीकांना  या आदेशान्‍वये देण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे व संबंधित यंत्रणांना सदर मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करणे सुलभ होण्‍यासाठी उक्‍त नमुद आदेशान्‍वये देण्‍यात आलेल्‍या मार्गदर्शक सुचनांमधील बाबी / मुद्दे  संक्षिप्‍तस्‍वरुपात खालील तक्‍यात एकत्रितपणे नमुद करण्‍यात येत आहेत.        या आदेशातील नमुद करण्‍यात आलेल्‍या अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये समाविष्‍ठ असलेल्‍या सेवा आणि आस्‍थापना यांना सट देण्‍यात आलेल्‍या वेळे मध्‍ये खालीलप्रमाणे बदल करण्‍यात येत असुन खाली नमुद केल्‍याप्रमाणे वेळ अमलात राहील. हा आदेश  जालना जिल्‍हयासाठी  लागु राहतील.

अ.क्र.विषयसुरु ठेवण्‍याची कालमर्यादा 
1.                                                                             संचारबंदी 
1.1नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरणेअत्‍यावश्‍यक कारण / अत्‍यावश्‍यक सेवेशिवाय नागरीकांना घराबाहेर पडण्‍यास मनाई राहील. 
1.2अत्‍यावश्‍यक सेवादेणारे अधिकारी / कर्मचारी, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाशी संबंधित असणारे अधिकारी / कर्मचारीओळखपत्रासह संचार करण्‍यास परवानगी (24 तास) 
1.3संचारबंदी मधुन रुग्‍णालय, रोगनिदान केंद्र, चिकित्‍सालय, लसिकरण केंद्र, वैदयकिय विमा कार्यालय, औषध दुकाने, औषधी निर्मिती उदयोग इतर वैदयकीय आणि आरोग्‍य सेवा यांचा त्‍यांना आवश्‍यक अशा अनुषगीक उत्‍पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतुक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुंके, मास्‍क, वैदयकीय उपकरणे, त्‍यांना सहाय्यभुत कच्‍चा माल उदयोग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्‍पादन व वितरण यांचा देखील समावेश असेलपुर्ण वेळ : (24 तास) 
1.4कोविड चाचणी : लसिकरणपुर्ण वेळ : (24 तास) 
1.5पशुवैदय‍कीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखादयाची दुकाने, Pet Shop, कृषी संबंधित सेवा – बियाणे, खते, अवजारे व त्‍यांची दुरुस्‍ती इत्‍यादीसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 

1.6
अत्‍यावश्‍यक सेवा देणारी दुकाने (किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खादयपदार्थाची दुकाने – पार्सल सेवा, चिकन, मटन, अंडी, मासे, पोल्‍ट्री दुकाने)सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
गॅस सिलींडर पुरवठापुर्णवेळ 
1.7भाजीमंडईसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
1.8ऑप्‍टीकल्‍स – चष्‍मादुकानेसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
2.शासकीय कार्यालये 
2.1आरोग्यसेवा, वीज, पाणी, बॅंकीग, वित्‍तीय सेवा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन100 % उपस्थिती (ओळखपत्र लावणे अनिवार्य) 
2.2स्‍थानिक प्राधिकरणाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवापुर्णवेळ : (24 तास) 
2.3इतर शासकीय कार्यालये50 % उपस्थिती (कोविड – 19 च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासांठी चालु ठेवायचे असल्‍यास शासकीय विभागांचे / कार्यालयांचे प्रमुख (HOD)यांचे निर्णयानुसार 100 % क्षमतेने सुरु – ओळखपत्र अनिवार्य) 
2.4शासकीय बैठकाऑनलाईन पध्‍दतीने 
2.5शासकीय कार्यालयामध्‍ये विनापरवानगी (Walking) अभ्‍यागतांना प्रवेश (पोलीस स्‍टेशन वगळता)प्रवेश बंदी 
2.6शासकीय कार्यालयात कार्यालयप्रमुखाची पुर्वपरवानगी घेऊन भेट देणारा अभ्‍यागतभेट देण्‍यापुर्वी 48 तासांच्‍या आत RTPCR/RAT/TruNAT/ CBNAAT Test चाचणी निगेटिव्‍ह असेल तरच प्रवेश 
3निमसकारी – खाजगी कार्यालये 
3.1बॅंका, विजवितरण कंपनी, टेलिकॉम कंपन्‍या, औषधी वितरण, उत्‍पादन कार्यालये, पुर्णवेळ : (24 तास) 
3.2परवानगी दिलेले कार्यालय वगळता इतर सर्व खाजगी कार्यालयेबंद 
3.3SEBI व SEBI अंतर्गत मार्केट इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर्स संस्‍था उदा. स्‍टॉक एक्‍सचेंजेस, गुंतवणुक व क्लिअरिंग कार्पोरेशन्‍स, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्‍था, RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्‍यवर्ती संस्‍था उदा. स्‍वतंत्र प्रा‍थमिक डिलर्स, CCIL, NPCL, पेमेंट सिस्‍टीम ऑपरेटर्स, फायनान्शिअल मार्केट, सर्व प्रकारचे Non-Banking वित्‍तीय संस्‍था, सर्व सुक्ष्‍म वित्‍तीय संस्‍था, CA, वकीलांची कार्यालये, कस्‍टम हाऊस एजंट/लसीकरणाशी संबंधित परवानाधारक मल्‍टी मोडल ट्रान्‍सपोर्ट ऑपरेटरसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
3.4बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांची परीक्षा घेण्‍यासाठी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची परवानगी घेऊन परीक्षार्थी व परीक्षेसाठी नियुक्‍ती असणारे अधिकारी / कर्मचारीसूट (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत) 
4अत्‍यावश्‍यक सेवा 
4.1रेल्‍वे, टॅक्‍सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची मान्‍सून पूर्व कामे, मालवाहतूक, स्‍थानिक प्राधिकरणांच्‍या सार्वजनिक सेवा, मान्‍यताप्राप्‍त मिडीयापूर्ण वेळेः (24 तास) 
4.2बस, रेल्‍वे, विमान यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना घरापासून बसस्‍थानक, रेल्‍वे स्‍थानक, विमानतळापर्यंत व तेथून घरापर्यंत जाण्‍यासाठी परवानगीवैध टिकीटाचे आधारे परवानगी राहील 
4.3उद्योगांमध्‍ये काम करणारे कामगार यांना कामावर जाण्‍यासाठीची परवानगीवैध ओळखपत्राचे आधारे परवानगी राहिल. (10%व्‍यवस्‍थापकीय कर्मचारी), ओळखपत्र आवश्‍यक 
4.4दुकाने, बाजारपेठ, मॉल्‍स (अत्‍यावश्‍यक सेवा देणारी दुकाने वगळून)बंद राहतील 
4.5आठवडी बाजारबंद राहतील 
4.6पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्‍पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स/क्‍लाउड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय/खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेजेस, टायर पंक्‍चर दुकाने, दूरसंचार सेवा सुरळित राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेल्‍या बाब/सेवाअत्‍यावश्‍यक सेवेसाठी पूर्ण वेळः 24 तासनागरीकांसाठीः सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 
5वाहतूक व्‍यवस्‍था 
5.1ऑटोरिक्षापूर्ण वेळः (24 तास) – चालक व 2 प्रवासी फक्‍त (Driver + 2 Passengers only),नियमांचा भंग केल्‍यास दंड रु. 500/- 
5.2टॅक्‍सी/कॅबपूर्ण वेळः (24तास) – चालक व परिवहन नियमानुसार अनुज्ञेय क्षमतेच्‍या 50%वाहन क्षमता(Driver + 50% Vehicle Capacity as per RTO)नियमांचा भंग केल्‍यास प्रवाशी व चालक प्रत्‍येकी दंड रु. 500/- 
5.3सार्वजनिक बस सेवापूर्ण वेळः (24 तास) परिवहन विभागाच्‍या मान्‍यतेनुसार पुर्ण आसन क्षमतेने परवानगी आहे. परंतु प्रवाशांना उभे राहुन प्रवास करण्‍यास मनाई राहील. 
5.4रेल्‍वेपुर्ण वेळः (24 तास)- विना मास्‍क व उभे राहुन प्रवास करण्‍यास मनाई राहील. नियमाचा भंग केल्‍यास दंड रु. 500/- 
5.5खाजगी वाहने, खाजगी बसेसअत्‍यावश्‍यक सेवेसाठी, आपत्‍कालीन सेवेसाठी तसेच या आदेशात नमुद केलेल्‍या कारणांसाठी 
6बांधकाम व उत्‍पादन क्षेत्र 
6.1बांधकामाच्‍या ठिकाणी मजूरांना राहणयची सोय असल्‍यास असे बांधकाम तसेच बांधकाम/ विकास कामांकरीता लागणारी सामग्री ने-आण करणे,पूर्ण वेळः (24 तास)नियमाचा भंग केल्‍यास सदर व्‍यवसायीकास 10000/- रु. दंड 
6.2उत्‍पादन करणारे उदयोग आस्‍थापना/ कंपन्‍या/घटकपूर्ण वेळः (24 तास) 
6.3ऑक्सिजन उत्‍पादन/जिवरक्षकऔषधे/औषधी उत्‍पादनेपूर्ण वेळ सुरु 
7रेस्‍टॉरंट, बार,हॉटेल्‍स/खादयपदार्थ विक्रेते 
7.1रेस्‍टॉरंट, बार,हॉटेल्‍सकेवळ घरपोच सेवा (Home Delivery)देण्‍यास परवानगी सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंतनियमाचा भंग केल्‍यास दंड रु. 1000/- व संबंधीत आस्‍थापनेला रुपये 10000/- दंड 
7.2रस्‍त्‍याच्‍या कडेला खादयपदार्थांची विक्री करणारे विक्रेतेफक्‍त पार्सल सुविधा व होम डिलीव्‍हरी सुविधा – सकाळी 7.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंतनियमाचे उल्‍लंघन करणा-यास 500/- रु. दंड व संबंधीत विक्रेत्‍यास रु. 500/- दंड व संबंधीत दुकान कोवीड-१९ संपेर्यंत बंद 
8वृत्‍तपत्रे 
8.1शासन मान्‍य यादीवरील वृत्‍तपत्रे, उपगृह वाहीनीवरुन प्रसारीत होणारे चॅनल्‍स, अधिस्विकृतीधारक (Accreditation)पत्रकारपूर्ण वेळः (24 तास) 
8.2वितरणसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत 
8.3छपाईपूर्ण वेळः (24 तास) 
9करमणूक व मनोरंजन 
9.1चित्रपट गृहे, सिनेमा हॉल्‍स, नाटयगृहे व सभागृहे, मनोरंजन केंद्रे (Amusement Parks) / Arcades / व्‍हीडीओ गेम सेंटर्स, वॉटर पार्कस् (Water Parks),क्‍लब्‍सजलतरण तलाव, व्‍यायाम शाळा (Gyms), स्‍पोर्ट कॉम्‍प्‍लेक्‍सबंद राहतील 
9.2मोकळया जागावरील उपक्रम, मनोरंजन पार्क , प्रेक्षागृहे, बगीचे/उदयाने, सार्वजनिक मैदाने,खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्‍पोर्टस क्‍लॉम्‍प्लेक्‍स, योगा क्‍लासेस,जिम, व्‍यायामशाळा, जलतरण तलावबंद राहतील. 
10धार्मीक व सामाजीक बाबी 
10.1धार्मिक स्‍थळे / प्रार्थाना स्‍थळे ( नियमीत अर्चक यांना पुजा करण्‍याची सुट राहील)बंदः फक्‍त पुजारी इमाम,पाद्री धर्मगुरु  भंते,इ. नियमीत पुजा अर्चा सुरु 
10.2धार्मिक / सामाजीक / राजकीय/ सांस्‍कृतीक कार्यक्रमबंद 
10.3मुस्‍लीम बांधवाचा रमजानचा  महिना लक्षात घेवुन दूध व फळे यांच्‍याशी संबधीत दुकानेसकाळी 7.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत तसेचसायं. 5.00 ते 8.00 वाजेपर्यत
10.4लग्‍न समारंभ 25 लोकांच्‍या उपस्थितीत संबंधित स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेची (न.प./न.पं./ग्रा.पं)पुर्वपरवानगी घेवूनसंबधित Incident Commander तथा तहसिलदार यांची परवानगी घेतली असल्‍यास (सकाळी 7.00 ते  रात्री  8.00 पर्यंत)
10.5अंत्‍यविधी कार्यक्रम केवळ 20 लोकांच्‍या उपस्थितीमध्‍येपुर्ण वेळ
11शाळा / महाविद्यालय / कोचिंग
11.1शाळा ,महाविद्यालयबंद

11.2
शाळा, महाविद्यालय केवळ इयत्‍ता 10 व 12 च्‍या परीक्षेकरीता विद्यार्थी व परीक्षेसंबंधीत स्‍टाफ यांना परीक्षेकामी ये-जा करणेसकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close