Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादशेतीविषयक

औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी ‍

औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील  पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी ‍ केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

औरंगाबाद:  औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.

पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह  वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारी, मकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना  दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर  शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्याने, बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरी, वरखेड येथे विकास उबाळे यांच्या 4 एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गंता आणि श्री. कौल यांनी ‘तुमच्या पिकांची पाहणी केली आहे, पंचनामा झाला आहे,  झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहे, त्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवाद

औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील काला, नंदू भालेकर, संदीप दुदल, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लहू भालेकर, पिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवाल, विठ्ठल बहुरे, गाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडे, निलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख श्री. गंता आणि श्री. कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close