Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

राजाबजार जैन मंदिरात आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या ३८ वा दिक्षादिवस उत्साहात साजरा

औरंगाबाद/पियुष कासलीवाल

– श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्श्र्वनाथ मंदिर राजाबजार येथे आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या सुशिष्या गननी आर्यिका विशाश्री माताजी, आर्यिका विपाक्षणाश्री माताजी, आर्यिका विमुक्तीश्री माताजी, आर्यिका विदर्शनाश्री माताजी, आर्यिका विशुध्दश्री माताजी आर्यिका विसिध्दीश्री माताजी, आर्यिका विशुचिश्री माताजी, आर्यिका विश्रृती माताजी, क्षुल्लिका विश्रितीश्री माताजी आदींचा २०२० चा चातुर्मास उत्साहात सुरâ असुन त्यांच्या सानिध्यात १६ दिवसीय शांती विधान उत्साहात सुरâ असुन दिनांक १९ डिसेंबर रोजी गणाचार्य १०८ विरागसागरजी महाराज यांचा ३८ वा दिक्षा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सकाळी ७ वाजता भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक संपन्न होवुन गणाचार्य विरागसागरजी महाराजांच्या चित्रांसमोर दिप प्रज्वलन गुरâ पाद पुजा करâन विनयांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी,सचिव अशोक अजमेरा, सहसचिव नरेद्र अजमेरा, ब्र.शिवा दिदी, रौनक दिदी, विनोद कासलीवाल, इंदरचंद सेठी, वर्धमान बाकलीवाल, संगीता सेठी, संगीता गंगवाल, सुनंदा सेठी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.    आचार्य विरागसागरजी महाराज यांची जैनेश्वरी दिक्षा दिनांंक १९ डिसेंबर १९८३ रोजी औरंगाबाद येथे आचार्य विमलसागरजी महाराज यांच्या चातुर्मासामध्ये दिक्षा देण्यात आली होती. आचार्य विरागसागरजी महाराज विषयी आर्यिका विशाश्री माताजी यांनी आापल्या प्रवचनात सांगीतले की, आज माझे सौभाग्य आहे की, ज्या गुरâंकडुन मी आर्यिका दिक्षा घेतली आहे. त्या गुरâंच्या दिक्षा गावी मला त्यांच्या दिक्षा दिवस साजरा करण्याचे सौभाग्य मिळत आहे. हे फार महत्वाचे आहे. आचार्य विरागसागरजी महाराज यांचे वात्सल्य हे अप्रतिम आहे असेही त्यांनी सांगीतले आहे. यावेळी कार्यकमाचे सुुत्रसंचालन व प्रास्ताविक सचिव अशोक अजमेरा यांनी केले. यावेळी उपस्थित भाविकांना हिरांचद विनोद श्रेणीक कासलीवाल परिवारांच्या वतीने प्रसादी वाटण्यात आली. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close