Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

लिहाखेडी येथे ‘ गरीबासोबत दिवाळी ‘हा कार्यक्रम साजरा

mh20live Network

सिल्लोड / विशाल जाधव

सध्या समाजात गरीब श्रीमंती अशी खुप मोठी दरी आहे, ती कुठेतरी संपली पाहिजे, दिपावली आपण मोठ्या आनंदाने साजरी करतो,सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देतो, परंतु आजही समाजातील काही कुटुंबांना गरीबी मुळे  दिपावली माहिती नसते, अशा वेळी ज्या समाजातून आपण मोठे झालो,त्या समाजाचे काही देणे असते असे म्हणतात,हेच भान ठेवून आपली दिवाळी त्यांच्या सोबत साजरी केली पाहिजेत ,आज मलाही गरीबी कुटुंबां सोबत दिपावली साजरी करण्याचा योग आला असल्याने त्यामुळे मला आनंद होत असल्याचे भावनिक उद्दगार प्रशिक्षित उपविभागीय अधिकारी पुजा पाटील यांनी केले.तालुक्यातील लिहाखेडी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांच्या वतीने दिपावली निमित्त” गरीबा सोबत दिपावली” हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.   या वेळी पाटील बोलतांना पुढे की, अनेक वेळा राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, असे कार्यक्रम घेतांना आपण बघतो , विनोद चव्हाण यांनी वैयक्तिक रित्या असा कार्यक्रम घेऊन समाजात आपले नाव लौकीक केले आहे, त्यांनी असे उपक्रम कायम राबवावे माझ्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षित उपविभागीय अधिकारी पुजा पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ठाकुर,ग्रांमपंचायतचे प्रशासकीय अधिकारी नामदेवराव साखळे,मा.प्र।शिवराम पा साखळे  पंचायत समिती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे समन्वयक अरुण घोलप, शाखा अभियंता अमोल हजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी माजी सरपंच भाऊलाल चव्हाण, माजी उपसरपंच अंबादास सपकाळ, सुनील साखळे, कृष्णा फरकाडे, प्रभाकर बावस्कर,तूकाराम डफळ, मारोती गोरे, यांच्यासह गोसावी समाजातील कुटुंब उपस्थित होते  .या वेळी उपस्थित गरीब कुटुंबांना साड्या, दिपावली फराळ वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊलाल चव्हाण यांनी तर सुत्रसंचलन विनोद चव्हाण यांनी केले. आभार प्रकाश चव्हाण मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close