Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

सी.सी.आय कापूस खरेदी प्रकरणी शेतकऱ्यांचा अचानक मुख्यमार्गावर रास्तारोको कापूस खरेदीत व्यापारी-शेतकऱ्यांत दुजाभाव का?


बैलगाडी उलटुन तरुण जखमी शेतकऱ्यांत संताप

भोकरदन /सुरेश गिराम

भोकरदन:- शहरातील सिल्लोड भोकरदन मार्गावर गुरुवारी ता.दहा रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांनी शासकीय कापुस खरेदीत दुजाभाव करत असल्याकारणाने अचानक रस्तारोको केला होता.
तर सिल्लोड भोकरदन महामार्गावर शेतकऱ्यांनी बैलगाड्या रस्त्यावर उतरून संबंधित अधिकारी कर्मचारी विरोधात संतप्त शेतकऱ्यांकडून घोषणा करण्यात आल्या होत्या त्यात एक तरुण बैलगाडी पार्किंग मधून येत असताना रात्री अचानक नाल्यात उलटून तरुण किरकोळ जखमी झाला होता.या मुळे सर्व शेतकरी वर्गाला संबंधितावर मोठा रोष केला आणि संतप्त वातावरणात रस्ता धरला होता तर शेतकऱ्यांनी बोलतांना सांगितले की संबंधित अधिकारी कर्मचारी हे व्यापारी व शेतकऱ्यांसोबत दुजाभाव करत असून व्यापाऱ्यांच्या गाड्या दिवसा आधी घेतात आणि शेतकऱ्यांच्या बैलगाड्या रात्रीच्या अंधारात असे का ? तर काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा व्यापाऱ्यांसोबत संगनमताचा खेळ सुरू असल्याचे सांगितले आहे दरम्यान तासदीड तास सिल्लोड भोकरदन महामार्गावर वाहतूक दोन्ही बाजूस दोन दोन कि.मी.अंतरावर वाहतूक ठप्प होती सादरील प्रकरणाची पोलिसांना मिळताच भोकरदन पोलीस ठाण्यात नवीन रुजू झालेले सा.पोलीस निरीक्षक श्री तडवी,व पो.उपनिरीक्षक श्री. नागरगोजे यांनी तात्काळ आंदोलन ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तुमच्या मागण्या संदर्भात सकाळी संबंधित अधिकारी बैठक घेऊन तुमचा प्रश्न मार्गी लाऊ अशे तोंडी आश्वासन या ठिकाण ए पी आय तडवी यांनी दिले त्यावर शेतकऱ्यांनी रस्त्यावरील आपआपल्या बैलगाड्या परत घेऊन रास्ता मोकळा केला होता.


दरम्यान शहरात गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चार शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला असून तालुक्यातुन जवळपास चाळीस कोटीरुपयांचा सत्तर हजार क्विंटल कापूस खरेदी झाला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगितले आहे.
तालुक्यातुन कापसाची आवक वाढल्याने खरेदीसाठी विलंब असल्याचे सांगितले जाते बाजार समिती मार्फत नियोजित वाहन पार्किंग साठी जागा उपलब्ध असून सध्या चारशे वाहने नंबरलावून बसले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close