Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

सोयाबीन पीकाची काळजी घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारींचे आवाहन

           औरंगाबाद, दि.24 :- सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पिक सुन केंद्र शासनाच्या सुचनांनुसार त्यामध्ये बियाणे बदलाचे प्रमाण 35 टक्के पर्यंत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पेरले जाणारे बियाणे हे सरळ वाणांचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. दरवर्षी नवीन बियाणे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊन पर्यायाने त्याला आर्थिक लाभ कमी होतो एकदा प्रमाणीत बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातुन येणरे बियाणे पुढिल 2-3 वर्षापर्यत वापरता येते.

या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे विविध बियाणे कंपनीचे सीड प्लॉट नापास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी लागते तेवढे बियाणे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढिल वर्षी खरीप  2021 करीता लागणारे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी या वर्षीच्या खरीप हंगामातच राखून ठेवणे आवश्यक आहे. पुढील वर्षांच्या बियाणाची तरतुद करताना खालील सूचन महत्वाच्या ठरतात.

गुणवत्तापुर्ण सोयाबीन बियाणे निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाची विशेष काळजी

सोयाबीन पीक शेतामध्ये उभे असताना घ्यावयाची काळजी. भेसळ काढणे पेरलेल्या सोयाबीन जातीच्या गुणधर्मा व्यतिरिक्त इतर गुणधर्माची झाडे आढळल्यास वेळोवेळी काढून टाकावीत. किड व रोगग्रस्त झाडे तसेच तणे वेळच्या वेळी काढून टाकावीत. सोयाबीन पिकावर येणाऱ्या किड रोगांचा प्रार्दुभाव नियंत्रणात आणणेकरीता किटकनाशकांचा वापर करावा याबाबत क्षेत्रिय स्तरावर कृषि सहाय्यकांचा सल्ला घ्यावा.

सोयाबीन कापणी  पश्च्यात घ्यावयाची काळजी  सोयाबीन पिक परीपक्व अवस्थेत असताना पाऊस आल्यामुळे बियाण्याची उगवणक्षमता  कायम राखण्याकरिता कापणीपुर्वी त्यावर बावीस्टीन/ कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी.  सोयाबीन वाळवितांना त्याचा मोठा ढिग न करता पातळ थरावर वाळवावे. मळणी करतेवेळी बियाण्यामध्ये 13 ते 14 टक्के पेक्षा अधिक आर्द्रता असू नये. मळणी करतांना सोयाबीन बियाण्यास कुठलीही इजा होणान राही याची दक्षता घ्यावी. मळणी यंत्राचा वापर करताना मळणी यंत्राचे फेरे (RPM) 350 ते 450 पेक्षा अधिक असू नये. बियाणे मळणी केल्यानंतर सरळ पोत्यामध्ये न भरता त्यापुर्वी  2 ते 3 दिवस ते सावलीमध्ये वाळवावे. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे पोत्यामध्ये साधारणपणे 60 किलोपर्यंत साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवु नये. बियाणे साठवणूक करतेवेळी बियाण्याची थप्पी 7 पोत्यापेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजुक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करावी. स्वत: कडील पेरणी योग्य सोयाबीनची 3 वेळा उगवणक्षमता चाचणी करुनच पेरणी करावी.

तरी शेतकऱ्यांनी सध्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकाबाबत वरील प्रमाणे दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे अधिकचे सविस्तर माहितीकरीता तालुक्याचे तालुकेा  कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक,उपविभागीय कृषि  अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा , असे आवाहन डॉ. टि.एस मोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,औरंगाबाद यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close