Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यात 1022 कोरोनाबाधित, आज 60 रुग्णांची वाढ, 

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 1022 कोरोनाबाधित, आज 60 रुग्णांची वाढ
औरंगाबाद/,mh20live

दिनांक 18 (जिमाका) : औरंगाबाद शहरात आज 60 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1022 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1), रोशन गेट (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मदनी चौकातील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा 17 मे रोजी सायं.सहा वाजता, पैठण गेट येथील 56 वर्षीय महिला रुग्णाचा 18 मे रोजी मध्यरात्री 12.30 वाजता आणि बुड्डी लेन येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा एकूण तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मागील चोविस तासात शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत घाटीमध्ये 31, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 34 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
सध्या घाटीत 72 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत असेही कळवले आहे.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close