Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मिशन बिगीन अगेन’ अतंर्गत 30 जून पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी

MH20Live.com
औरंगाबाद:राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 जून 2020 च्या मध्य रात्रीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) हे मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.
शासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गतच्या आदेशानुसार दिनांक 01 जून पासून पुढील नियमावली व उपाययोजना लागू करण्यात येत आहे. याअंतर्गत कोव्हीड 19 च्या व्यवस्थापनाबाबत केंद्र शासनाचे निर्देश
औरंगाबाद जिल्हयासाठी पूढील प्रमाणे लागू राहतील.
रात्रीची संचारबंदी – अत्यावश्यंक बाबी वगळता रात्री 9.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यत नागरिकांची हालचाल/आवागमन पुर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
कमजोर व्यक्तींना/गटांना संसर्गापासून संरक्षण 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाच्याब खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यआक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देकांनुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.
कन्टेनमेंट झोन-
i. सार्वजनिक आरोग्ये कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडुन कन्टेनमेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.
ii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्हयाच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेनमेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेनमेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला,झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समुह, गल्ली्, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगांव, गांवाचा समूह, ग्रामपंचायतयांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
iii. कन्टेानमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा चालु राहतील. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमण चालु राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्या‍ण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.

निर्बंध शिथील करणे व टप्याटप्याने लॉकडाऊन उघडणे
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कन्टेंनमेंट क्षेत्र वगळता खालील बाबींना निर्बधासह चालू करण्यास परवानगी राहील. ज्या बाबींना यापुर्वी परवानगी देण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोव्ही)ड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याससाठी आवश्यंक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मा.मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.
त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्येर लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून वि‍वक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
a. अनुज्ञेय असलेल्या कुठल्या ही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
b. क्रिडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्या‍साठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
सर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i. दुचाकी – केवळ चालक
ii. तीनचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
iii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
d. सामाजिक अंतर व निर्जतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करुन जिल्हया अंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त 50 टक्कें क्षमतेने करता येईल.
e. आंतर जिल्हार बस वाहतूक बंद राहील.
f. सर्व बाजार / दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.
मनाई आदेशा दरम्यान दिनांक 30 जून 2020 पर्यत प्रतिबंधीत असलेल्यार बाबी खालीलप्रमाणे आहेत –
i. सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
ii. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक – वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बु्लन्स्, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.
iii. रेल्वे प्रवासी वाहतूक व खाजगी विमान सेवा बंद राहतील तथापी स्व तंत्र आदेशाव्दारे परवानगी दिलेल्या बाबी वगळून.
iv. सर्व सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
v. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.
vi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
vii. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील. तसेच बस डेपो, रेल्वे स्टे्शन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्याासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
ठराविक व्यक्ती व वस्तुच्या आवागमणास सुनिश्चित करण्यायबाबतचे विशेष निर्देश
i. सर्व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती जसे की, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छ्ता कर्मचारी, अॅम्बूलन्स यांना कोणत्याही निर्बंधा शिवाय आंतरराज्यीय आणि आंतर-जिल्हा आवागमनास परवानगी राहील.
ii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार आंतर राज्य व आंतर जिल्हया मध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या हालचाली नियंत्रित असतील.
iii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार श्रमिक विशेष गाड्या चालू राहतील.
iv. सर्व रिकाम्या ट्रकसह सर्व प्रकारच्या वस्तू‍ /मालवाहतुकीची आंतरराज्यीय हालचाल करण्यास परवानगी राहील.
आरोग्य सेतू अॅपचा वापर
i. आरोग्य सेतू अॅप हे संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
ii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
iii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्यक सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.
स्थानिक पातळीवर नागरीकांनी स्व.तः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने,औषधालये व कृषि सेवा संबंधीत दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालु राहतील.

परिशिष्ट-१
MISSION BEGIN AGAIN
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे-

 1. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्याय ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्कावापरणे बंधनकारक आहे.
 2. सार्वजनिक ठिकाणी दोन व्य,क्ती्मधील अंतर किमान 6 फुट (दो गज की दुरी) ठेवावे. दुकानामध्येच ग्राहकाची संख्याा एकावेळी 5 पेक्षा जास्ता असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार/आस्‍थापना चालक यांचेवर राहील.
 3. मोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.
  विवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक
  व्यक्तींना परवानगी असणार नाही.
 4. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या‍ ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील. व त्या साठी संबंधीत स्था्निक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
 5. सार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्याास मनाई राहील.
 6. पान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.

कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना

 1. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्ते घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.
 2. सार्वजनिक आरोग्यय व कुटुंब कल्याण विभागाकडुन निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थाानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्यार ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
 3. सर्व कामाच्याे ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.
 4. दोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.

परिशिष्ट-2
i. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरविणा-या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे चालु राहण्यास परवानगी असेल.
ii. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरवित नसलेल्या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे दिलेली सुट व मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर चालु राहण्या‍स परवानगी राहील. तसेच अशी दुकाने संबंधीत महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहतील.
iii. सर्व अत्यावश्यक वस्तु/साहित्य व अत्यावश्यक नसलेल्या वस्तु्/साहित्य यांच्या ई-कॉमर्स सेवा चालू राहतील.
iv. सद्या चालू असलेली सर्व औद्योगिक केंद्रे कार्यरत राहतील.
v. सर्व बांधकामाशी निगडित क्षेत्रातील (सार्वजनिक/खाजगी) कामे सुरु राहतील. तसेच सर्व मान्सुसनपुर्व कामे (सावर्जनिक/खाजगी) सुरु राहतील.
vi. घरपोच सेवा देण्यासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
vii. ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
viii. सर्व शासकीय कार्यालये 5 टक्के किंवा 10 व्यक्ती (जे जास्त असेल ते) या तत्वावर चालू राहतील.
ix. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i. दुचाकी – केवळ चालक
ii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
x. एखाद्या विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार इतर कोणत्या ही बाबींसाठी परवानगी राहील.
दंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्दा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्यांही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close