Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा सेविकांना भाऊबीज भेट

संभाजीनगर :कोरोनामुळे लोकडाऊन काळात खरं कोणी कार्य ,सेवा केली असेल तर ती आशा सेविकांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता प्रत्येक घरोघरी जाऊन आशा सेविकांनी दिलेले कार्य केले अशा सेविकांना एखादी भेट देत असताना ती रोख रकमेपेक्षा वस्तूरुपी भेट दिली तर त्यातून प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होतो हा प्रेम आणि जिव्हाळा प्रत्येकाच्या रोजच्या जीवनात फार महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असे प्रतिपादन बजाज ऑटो लिमिटेड चे सल्लागार सतीश त्रिपाठी यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आशा सेविकांना भाऊबीज भेट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे यातच करोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेविकांना आशा सेविकांना भाऊबीज भेट हा कार्यक्रम तापडिया नाट्यमंदिर याठिकाणी घेण्यात आला शहरातील २५० आशा सेविकांना साडी, चोळी ,फराळ अशी वस्तू रुपी भेट देण्यात आली. यावेळी बजाज ऑटो लिमिटेड चे सल्लागार सतीश त्रिपाठी आमदार प्रदीप जैस्वाल आमदार अंबादास दानवे ह भ प नवनाथ महाराज आंधळे यांच्या हस्ते ही भेट देण्यात आली याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर शहरप्रमुख बाळासाहेब थोरात विश्वनाथ स्वामी विधानसभा संघटक राजू वैद्य उपशहरप्रमुख राजू दानवे महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा सहसंपर्क संघटक सुनीता आऊलवार उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप रेखा सूर्यवंशी शहर संघटक प्राजक्ता राजपूत राम हरी बापू जाधव गजानन मनगटे वामन शिंदे पुरुषोत्तम पानपट आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांनी केले होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close