Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

भावाने दिला भावाला मुखाग्नी, शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन

जळगाव : जम्मू काश्मिर – श्रीनगर येथे झालेल्या दहशतवादी जळगावचे जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले होते. आज त्यांच्या मुळगावी साश्रू नययांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यश देशमुख यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावच्या या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाया एकवटला होता.

जम्मू काश्मिरमधील श्रीनगर इथं 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावचे जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते. त्यांचं पार्थिव आज सकाळी औरंगाबाद मार्गे मुळगावी आणण्यात आले.

यश देशमुख यांचं पार्थिव मुळगावी दाखल झाल्यानंतर अंत्यदर्शनसाठी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी गर्दी केली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने जिल्हाभरातून अनेक नागरिक शहीद जवानाला अखेरचा सलाम देण्यासाठी उपस्थित झालेले होते. यावेळी जमलेल्या जमावाने पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि ‘यश देशमुख अमर रहे’ अशा घोषणा दिल्यात. यश देशमुख यांचा लहान भाऊ मयुर देशमुख याने आपल्या शहीद भावाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close