Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ब्रँड अँबेसेडर नवेली देशमुख यांचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते गौरव

    औरंगाबाद, दिनांक :  लोकसभा व  विधानसभा  निवडणुकीमध्ये नवमतदारांमध्ये मोठ्याप्रमाणात मतदान करण्याविषयी जनजागृती निर्माण केलेल्या, औरंगाबाद जिल्ह्यातील निवडणूक विभागाच्या ब्रँड अँबेसेडर तसेच  शासनाच्या माझी कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमध्ये पुढाकार घेऊन जनसामान्यात जनजागृती केलेल्या, मिस इंडिया युनिवर्सच्या उपविजेत्या नवेली देशमुख यांचा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी  अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, मंदार वैद्य, संगीता सानप, आप्पासाहेब शिंदे आदींसह तसेच नवेली यांच्या आई प्रा. सुवर्णलता शिंदे, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, मराठवाड्याची कन्या असलेल्या नवेली देशमुख यांनी जिल्हा निवडणूक विभागाची ब्रँड अँबेसेडर म्हणून जबाबदारी सांभाळताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचे या निवडणुकीतील कार्य उल्लेखनीय असेच आहे. युथ आयकॉन असल्याने नवमतदारांमध्ये मतदाना‍विषयी जनजागृती घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी पार पाडलेले आहे. जिल्हा प्रशासन आणि  जिल्हा माहिती कार्यालयाच्या आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग  त्यांनी घेतल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यात त्यांची भूमिका नक्कीच उपयुक्त ठरली आहे. रन फॉर डेमोक्रसी  या उपक्रमाला तर नवमतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे.

नवेली देशमुख भरतनाट्यममध्येही पारंगत आहेत; राष्ट्रीयस्तरावरील बास्केटबॉल खेळाडूदेखील आहेत, असे सांगून नवेली देशमुख यांच्याही पुढील वाटचालीस जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी नवमतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती निर्माण केली. युथ आयकॉन असल्याने औरंगाबादकरांनीही माझ्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. शासनाच्या माझी कुटुंब माझी जबाबदारीमध्येही सहभाग घेऊन कोरोनाचा प्रसार वाढू नये याबाबत जनजागृती करता आली, याचा आनंद आहेच. प्रशासनाच्या विविध उपक्रमात सकारात्मकपणे सहभाग घेतलेला आहेच, जनजागृतीही केली आहे आणि यापुढेही करत राहणार असल्याचे मिस युनिवर्स नवेली देशमुख यांनी  यावेळी सांगितले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close