जयपूर, : समाजात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. प्रेम आणि प्रेमविवाह या अनुषंगाने अनेक ठिकाणी खुनासारखे गंभीर गुन्हेही सध्या घडताना दिसतात. पोलीस याचा योग्य तपास करून गुन्हेगाराला कोर्टात हजर करतात. जयपूरमधल्या (Jaipur) एका युवकाचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. प्रियकर घराशेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेयसीवर शारीरिक संबंधासाठी (Physical Relation) दबाव आणत होता. प्रेयसीने त्यास नकार देत त्याची गळा आणि तोंड दाबून हत्या (Murder) केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी (Police) गुरुवारी रात्री (10 मार्च) आरोपी महिलेला अटक केली असून, या प्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. मृत व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओबद्दल चौकशी केली असता, शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याने प्रियकराची हत्या केल्याचं प्रेयसीनं कबूल केलं आहे असं पोलिसांनी सांगितलं. या विषयीचं वृत्त दैनिक भास्कर
ने दिलं आहे.